Rohit Sharma and Virat Kohli: २०२३च्या विश्वचषकानंतर भारतीय क्रिकेट संघात अनेक बदल पाहायला मिळतील. लवकरच संघासाठी नवीन मुख्य निवडकर्ता निवडला जाईल, जो विराट कोहली, रोहित शर्मा आणि रविचंद्रन अश्विन यांसारख्या वरिष्ठ खेळाडूंसोबत त्यांच्या ‘भविष्या’विषयी चर्चा करेल. सध्या भारताचा माजी वेगवान गोलंदाज अजित आगरकर मुख्य निवडकर्ता होण्याच्या शर्यतीत पुढे दिसत आहे.

मर्यादित षटकांच्या फॉरमॅटबाबत भारतीय संघात मोठे बदल पाहायला मिळू शकतात. विराट कोहली ३४ वर्षांचा आहे आणि रोहित शर्मा ३६ वर्षांचा आहे. अशा परिस्थितीत त्यांच्या भवितव्याबद्दल छोट्या स्वरूपात चर्चा होणार आहे. २०२३च्या विश्वचषकानंतर टी२० आणि कसोटीवर लक्ष केंद्रित केले जाईल. पुढील वर्षी टी२० विश्वचषकही खेळवला जाणार आहे. अशा परिस्थितीत वन डे विश्वचषकानंतर टी२० संघात मोठे बदल पाहायला मिळू शकतात.

Kevin Pietersen's big statement on Sanju Samson
IPL 2024 : “जर मी निवडकर्ता असतो तर…”, इंग्लंडचा माजी दिग्गज केविन पीटरसनचे संजू सॅमसनबाबत मोठं वक्तव्य
Axar Patel on Impact Player Rule in IPL 2024
IPL 2024 : अक्षर पटेलने ‘इम्पॅक्ट प्लेयर’च्या नियमावर उपस्थित केला प्रश्न, सांगितले ‘या’ खेळाडूंसाठी का आहे धोकायदायक?
not to share any photo or video of the stadium on their accounts on the day of the match.
IPL 2024 : मीडिया हक्कांबाबत बीसीसीआयची कठोर भूमिका, संघ-खेळाडू आणि समालोचकांना दिल्या ‘या’ विशेष सूचना
Despite the efforts of PR Sreejesh the Indian hockey team lost
श्रीजेशच्या प्रयत्नांनंतरही भारतीय हॉकी संघाचा पराभव

विश्वचषक २०२३ नंतर मोठे निर्णय घेतले जातील

बीसीसीआयच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने इनसाइडस्पोर्टला सांगितले की, “मुख्य निवडकर्त्याचे एक काम म्हणजे खेळाडूंशी त्यांच्या भविष्यातील योजनांबद्दल बोलणे. रोहित आणि विराटही यापासून वेगळे नाहीत. होय, आम्ही ते जोपर्यंत खेळू इच्छितात तोपर्यंत ते खेळू शकतात. परंतु सर्व महान खेळाडूंना त्यांच्या योजनांवर विचार करण्यासाठी वेळ असतो. तीन फॉरमॅट आणि आयपीएल खेळणे सोपे काम नाही. यावर नक्कीच आगामी भविष्य काळात विचार केला जाईल.”

हेही वाचा: Team India: मिशन टी२०! वन डे वर्ल्डकप नंतर टीम इंडियाला विश्रांती नाहीच, ‘या’ संघाविरुद्ध खेळणार पाच सामन्यांची मालिका

विश्वचषकानंतर लगेचच टी२० आणि कसोटीवर लक्ष केंद्रित केले जाईल. हार्दिक पांड्या औपचारिकपणे टी२० आणि एकदिवसीय संघाचे कर्णधारपद स्वीकारू शकतो. एकदिवसीय विश्वचषकाप्रमाणे २०२४च्या टी२० विश्वचषकासाठी २० खेळाडूंचा मुख्य संघ ठेवण्याची योजना आहे. रोहितचा कोणत्याही नियोजनात सहभाग असण्याची शक्यता नाही. पण कोहलीचा फिटनेस पाहता त्याच्यासाठी अजून एक शक्यता आहे. मात्र ती वन डे आणि टेस्टमध्ये असू शकते.

साहजिकच, वन डे सामने खेळणे पुन्हा एकदा मागे जाईल. सध्याच्या योजनांनुसार, भारत पुढील FTP सायकलमध्ये ६१T20I खेळेल. त्यापैकी बहुतेक २०२४च्या ऑक्टोबरमध्ये यू.एस.ए. आणि वेस्ट इंडिजमध्ये  होणाऱ्या टी२० विश्वचषकाच्या तयारीसाठी ही सगळी योजना आखली जाईल. ट्वेंटी २० संघातून कोणाला मिळू शकतो डच्चू? रोहित शर्मा, विराट कोहली, रविचंद्रन अश्विन, मोहम्मद शमी, भुवनेश्वर कुमार, के.एल. राहुल.

बीसीसीआयच्या अधिकाऱ्याने सांगितले की, “साहजिकच विश्वचषकानंतर लक्ष ट्वेंटी २० कडे वळवले जाईल. २००७ पासून, आम्ही टी२० विश्वचषक जिंकलेला नाही आणि आता याला पहिले प्राधान्य दिले जाईल. कारण ही प्रतिष्ठेची बाब असून आयपीएल वेगाने पुढे वाढत जात आहे. जर आयपीएलमधून येणाऱ्या खेळाडूंसह टी२० विश्वचषक जिंकला नाही तर भारताची नाचक्की होईल. निवड समिती ५० षटकांच्या विश्वचषकानंतर लवकरच याबाबत ब्लू प्रिंट तयार करेल. टी२० खेळलेला आणि आयपीएलमध्ये प्रशिक्षक असलेला अजित आगरकर टी२० निवड करण्यासाठी आदर्श निवडकर्ता आहे. जरी कोहली आणि रोहित हे दोन मोठे स्टार असले तरी, या फॉरमॅटसाठी त्यांचा विचार फार कमी केला जाईल.

हेही वाचा: World Cup 2023: वर्ल्डकप वेळापत्रकात झाला बदल, आता ‘या’ दिवशी होणार भारत वि. श्रीलंका मुकाबला; जाणून घ्या

टी२० मधील दोन्ही खेळाडूंचे आकडे

कोहलीने ११५ सामन्यांच्या १०७ डावांमध्ये ५३च्या सरासरीने ४००८ धावा केल्या आहेत. एक शतक आणि ३७ अर्धशतकं केली आहेत. स्ट्राइक रेट १३८ आहे. त्याने ३५० हून अधिक चौकार आणि ११० हून अधिक षटकार मारले आहेत. रोहित शर्माबद्दल बोलायचे झाले तर त्याने १४८ सामन्यांच्या १४० डावांमध्ये ३१च्या सरासरीने ३८५३ धावा केल्या आहेत. त्याने ४ शतके आणि २९ अर्धशतके ठोकली आहेत. टी२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये जगातील इतर कोणत्याही फलंदाजाने त्याच्यापेक्षा जास्त शतके झळकावली नाहीत.