कसोटी क्रिकेटमध्ये आयसीसी क्रमवारीत पहिलं स्थान पटकावल्यानंतर भारतीय संघ आपला पहिला दिवस-रात्र कसोटी सामना खेळण्यासाठी सज्ज झालेला आहे. वेस्ट इंडिजच्या आगामी भारत दौऱ्यात दोन कसोटी सामन्यांपैकी एक कसोटी सामना दिवस-रात्र पद्धतीत खेळवला जाणार आहे. ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात या दौऱ्यातले सामने खेळवण्यात येणार आहे. आयसीसीच्या कोलकात्यात झालेल्या बैठकीत यासंदर्भात निर्णय घेण्यात आलेला आहे.
भारतीय संघ व्यवस्थापन, निवड समिती आणि सर्व पदाधिकाऱ्यांशी आमचं बोलणं झालेलं आहे. वेस्ट इंडिजच्या आगामी भारत दौऱ्यात दोन कसोटी सामन्यांपैकी एक कसोटी सामना दिवस-रात्र पद्धतीत खेळवण्यात येणार आहे. हैदराबाद किंवा राजकोटच्या मैदानात हा सामना खेळवला जाणार असल्याचं कळतंय. वेस्ट इंडिज क्रिकेट बोर्डानेही बीसीसीआयच्या या प्रस्तावाला विरोध दर्शवला आहे.
आतापर्यंत बांगलादेश आणि भारत या देशांचा अपवाद वगळता आयसीसीशी संलग्न असलेले सर्व देश दिवस-रात्र कसोटी सामना खेळले आहेत. (अफगाणिस्तान व आयर्लंड वगळता, दोन्ही संघांनी अद्याप आपला पहिला कसोटी सामना खेळलेला नाहीये.) याचसोबत वर्षाअखेरीस भारताच्या नियोजीत ऑस्ट्रेलिया दौऱ्यातही एक कसोटी सामना दिवस-रात्र खेळवण्याचा क्रिकेट ऑस्ट्रेलिया बोर्डाचा प्रयत्न आहे, मात्र बीसीसीआयने यावर अजुन आपली प्रतिक्रीया कळवलेली नाहीये. मात्र वेस्ट इंडिजविरुद्ध भारत आपला पहिला दिवस-रात्र कसोटी सामना खेळणार हे आता निश्चीत झालेलं आहे.