आज म्हणजे २४ सप्टेंबर हा भारतीय क्रिकेटमधील एक खास दिवस आहे. १४ वर्षांपूर्वी या दिवशी टीम इंडिया टी-२० वर्ल्डकप स्पर्धेचा पहिला विश्वविजेता बनला. भारताने महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वाखाली इतिहास रचला. आता हे सुवर्णयश लवकरच क्रिकेटप्रेमींसमोर एका चित्रपटाच्या रूपात येणार आहे. भारताच्या टी-२० वर्ल्डकप विजयाला १४ वर्षे पूर्ण झाल्यावर लंडनस्थित वन वन सिक्स नेटवर्क लिमिटेडने ‘हक से इंडिया’ नावाचा पहिला चित्रपटाची घोषणा केली. हा चित्रपट २००७मध्ये भारतीय क्रिकेट संघाच्या टी-२० वर्ल्डकप विजयावर आधारित असेल.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

वन वन सिक्स नेटवर्कचे सीईओ गौरव बहिरवानी आणि लंडनस्थित स्टॉक स्पेशालिस्ट जयदीप पंड्या यांनी या चित्रपटासाठी हातमिळवणी केली आहे. हक से इंडिया असे शीर्षक असलेल्या या चित्रपटाचे दिग्दर्शन मुंबईचे दिग्दर्शक सौगता भट्टाचार्य करणार आहेत. चित्रपट बनवणाऱ्या टीमचा असा विश्वास आहे, की या विजयाने भारताने आधुनिक काळात क्रिकेटच्या राजवटीच्या दिशेने पहिले पाऊल टाकले होते, जे आजही चालू आहे. हा चित्रपट ओटीटीवर रिलीज केला जाईल आणि चाहत्यांना त्यात वेगवेगळ्या कथानक पाहायला मिळतील. या चित्रपटाला चक दे ​​इंडिया फेम संगीतकार सलीम-सुलेमान यांचे संगीत असेल.

हेही वाचा – IPL दरम्यान ‘स्टार’ क्रिकेटरवर कोसळला दु:खाचा डोंगर; वडिलांच्या निधनामुळे परतला घरी

ब्रिटीश नेटवर्कचे सीईओ पुढे म्हणाले, ”जर १९८३ने आम्हाला पहिल्यांदा विश्वविजेता बनवले असेल तर २००७ ने जागतिक क्रिकेटमध्ये आमच्या वर्चस्वाची सुरुवात केली होती, जी आजही सुरू आहे. ‘हक से इंडिया’ २००७ च्या टी-२० विश्वचषक संघातील आमच्या नायकांचा उत्सव आहे. या विशेष प्रोजेक्टसर माझ्या मोठ्या पडद्याचा प्रवास सुरू करण्यासाठी मी खूप उत्साहित आहे. मला मनापासून आशा आहे, की हा चित्रपट आणि आमचे शीर्षकगीत प्रेक्षकांची मने जिंकेल.”

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: The film will come soon on team indias t20 world cup victory name has been decided adn
First published on: 24-09-2021 at 17:09 IST