सगळे देश जरी पाकिस्तानच्या फलंदाजीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत असले तरी त्यांच्या गोलंदाजीवर शंका घेणे जवळपास अशक्य आहे. विशेषत: पाकिस्तानच्या वेगवान गोलंदाजांची कामगिरी स्पष्टपणे दिसून येते. असाच काहीसा प्रकार क्राइस्टचर्चमध्ये खेळल्या गेलेल्या तिरंगी मालिकेच्या अंतिम सामन्यात पाहायला मिळाला. जिथे पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज हरिस रौफने न्यूझीलंडविरुद्ध आपल्या तुफानी गोलंदाजीने क्रिकेट चाहत्यांची मने जिंकली. यादरम्यान हरिस रौफने एक चेंडू टाकला ज्यामुळे किवी फलंदाजाची बॅट तुटली.

सहाव्या षटकात हॅरिस रौफने ग्लेन फिलिप्सची बॅट तोडली. षटकातील चौथ्या चेंडूवर हॅरिसने वेगवान गुड लेंथ चेंडू टाकला, ज्याचा फिलिप्सने बचाव केला. चेंडू त्याच्या बॅटच्या तळाला लागला आणि त्याची बॅट खालून तुटली. अक्षरशः अशी तुटली की त्याचे दोन तुकडे झाले. हॅरिस रौफ आफ्रिदीचा हा चेंडू १४३ किमी आहे. प्रति तास वेगवान होता. रौफच्या गोलंदाजीचा हा व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे.

हॅरिस रौफची सर्वोत्तम गोलंदाजी

टी२० विश्वचषकापूर्वी न्यूझीलंड, पाकिस्तान आणि बांगलादेश यांच्यात खेळल्या गेलेल्या तिरंगी मालिकेत हॅरिसची कामगिरी सर्वोत्कृष्ट होती. या मालिकेच्या अंतिम फेरीतही रौफने आपल्या वेगानं सर्वांना प्रभावित केलं. या सामन्यात रौफने न्यूझीलंडविरुद्ध ४ षटकात केवळ २२ धावा देत २ बळी घेतले. यादरम्यान त्याने असा चेंडूही दिला, जो पाहून भारतीय संघाचे टेन्शन नक्कीच वाढेल.

हेही वाचा : PAK vs NZ:  टी२० विश्वचषकापूर्वी पाकिस्तानने दाखवली ताकद, न्यूझीलंडला त्यांच्याच घरात हरवून जिंकली तिरंगी मालिका  

या व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये हॅरिस रौफने वेगाच्या जोरावर न्यूझीलंड संघाच्या फलंदाजाच्या बॅटचे तुकडे केले. न्यूझीलंडच्या डावात सहाव्या षटकात ही घटना घडली. हॅरिसने ओव्हरच्या चौथ्या चेंडूवर ग्लेन फिलिप्सला लेन्थ बॉल टाकला. इथे फलंदाज फक्त बचाव करू शकत होता, पण बॅट आणि बॉलचा संपर्क होताच फिलिप्सच्या बॅटची एक मोठी धार पूर्णपणे तुटली आणि खाली पडली.

हॅरिस रौफचा फॉर्म भारतीय संघासाठी मोठी डोकेदुखी ठरू शकते. टी२० विश्वचषकात भारतीय संघाचा पहिला सामना पाकिस्तानशी होणार आहे. स्टार गोलंदाज शाहीन आफ्रिदी पाकिस्तानच्या संघात पुनरागमन करणार आहे, तर हॅरिसही चेंडूने कहर करत आहे, त्यामुळे भारतीय संघाच्या फलंदाजांना सावधगिरी बाळगावी लागणार आहे. गेल्या दोन वर्षांत हॅरिस रौफच्या शेवटच्या षटकातील गोलंदाजीमध्ये (डेथ बॉलिंग) बरीच सुधारणा झाली आहे. यावर्षी शेवटच्या षटकामध्ये त्याचा इकॉनॉमी रेट फक्त ८.३ प्रति षटक आहे. २०२० सालापासून, हॅरिस रौफने शेवटच्या षटकांमध्ये प्रति षटक फक्त ८ धावा खर्च केल्या आहेत.