९०च्या दशकात जन्मलेल्या आणि या काळात वाढलेल्या मुलांसाठी ‘अंडरटेकर’ हे नाव काही वेगळं सांगण्याची गरज नाही. ‘डेडमॅन’ या नावाने प्रसिध्द असलेला WWE सुपरस्टार अंडरटेकर आता WWE रिंगमध्ये फायटिंग करताना पुन्हा दिसणार नाही. अंडरटेकरने WWE मधून कायमस्वरुपी निवृत्ती घेतली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अंडरटेकरने स्वत: ट्विट करुन ही दु:खद बातमी आपल्या चाहत्यांना दिली. तो आता ५५ वर्षांचा आहे. वाढत्या वयामुळे त्याच्या शरीरातील ताकत कमी झाली आहे. तो आता पहिल्यासारखा फाईटिंग करु शकत नाही. परिणामी त्याने निवृत्ती स्विकारली आहे.

खरं तर दोन वर्षांपूर्वीच त्याने निवृत्तीचे संकेत दिले होते. परंतु चाहत्यांच्या आग्रहाखातर WWE रेसलमेनियामध्ये तो पुन्हा एकदा फाईटिंग करताना दिसला. त्यावेळी रोमन रेन्ससोबत झालेल्या फाईटिंगमध्ये त्याला गंभीर दुखापत झाली होती. यापुढे अशा दुखापती माझं वृद्ध शरीर सहन करु शकणार नाही, असं त्यावेळी दिलेल्या एका मुलाखतीत त्याने सांगितलं होतं. अखेर वयाच्या ५५ वर्षी अंडरटेकरने WWE मधून अधिकृतरित्या निवृत्ती घेतली आहे.

खऱ्या आयुष्यात कसा आहे अंडरटेकर?

अंडरटेकरचं खरं नाव मार्क कॅलवे आहे. २४ मार्च १९६५ ला त्याचा जन्म अमेरिकेत टेक्सासमध्ये झाला होता. टेक्सास युनिव्हर्सिटीमध्ये त्याने ‘स्पोर्टस मॅनेजमेंट’चं शिक्षण घेतलं. त्याला खेळांची प्रचंड आवड होती. युरोपमध्ये प्रोफेशनल फुटबॉल खेळण्याची त्याची इच्छा होती पण आपला निर्णय बदलत त्याने कुस्तीपटू व्हायचं ठरवलं. १९८४ पासून आपल्या कुस्तीच्या करिअरला सुरूवात करणाऱ्या अंडरटेकरने आता ३० वर्षांच्या प्रदीर्घ कारकीर्दीनंतर आता निवृत्त व्हायचं ठरवलंय. आता तो त्याच्या चार मुलांसोबत छान आयुष्य जगणार आहे. त्याच्या निवृत्तीमुळे WWEमधला आणखी एक आयकॉन अॅक्टिव्ह रेसलिंगपासून दूर गेलाय हे नक्कीच.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: The undertaker retires from wwe mppg
First published on: 22-06-2020 at 11:45 IST