नवी दिल्ली : बांगलादेशमध्ये होणाऱ्या जागतिक एकादश संघाविरुद्धच्या दोन ट्वेन्टी-२० सामन्यांत भारत आणि पाकिस्तानचे खेळाडू आशियाई एकादश संघाकडून एकत्रित खेळणार नाहीत, असे भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) संयुक्त सचिव जयेश जॉर्ज यांनी गुरुवारी सांगितले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

बांगलादेशचे राष्ट्रपिता शेख मुजिबूर रेहमान यांच्या जन्मशताब्दी वर्षांनिमित्त पुढील वर्षी मार्च महिन्यात दोन सामन्यांचे आयोजन करण्यात आले आहे. १८ आणि २१ मार्चला होणाऱ्या या दोन सामन्यांसाठी भारताच्या पाच खेळाडूंची निवड झाली आहे.

गेली सात वर्षे भारत आणि पाकिस्तान यांच्यात मालिका झालेल्या नाहीत. परंतु विश्वचषक आणि आशियाई स्पर्धामध्ये या उभय संघांमध्ये सामने झालेले आहेत.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: There will be no pakistan players in asia xi for bangladesh t20is says bcci zws
First published on: 27-12-2019 at 00:01 IST