क्रिकेट म्हंटलं की आठवतात ते दिग्ग्ज क्रिकेटपटू. पण त्या आठवलेल्या क्रिकेटपटूंपैकी किती क्रिकेटपटू या महिला असतात? सहसा क्रिकेटचा उल्लेख झाला की महिला क्रिकेटपटू डोळयापूढे येत नाहीत. क्रिकेटसह जगभरातील सर्वच क्षेत्रात महिला पुरुषांच्या बरोबरीने कार्यरत आहेत. क्रिकेटमध्येही महिलांनी आपले अस्तित्व सिद्ध केले आहे. त्यात अनेक महिला क्रिकेटपटूंनी आपल्या कामगिरीच्या जोरावर विविध सन्मान आणि चाहतावर्ग मिळवला आहे. आणि त्यात अनेक महिला क्रिकेटपटू जितक्या कर्तृत्ववान आहेत, तितक्याच देखण्या आणि सुंदर आहेत. तुम्ही क्रिकेटविश्वातील या ५ महिला क्रिकेटपटूंना पाहिलं आहेत का?

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

१ . एलिस पेरी

एलिस पेरी ही अतिशय देखणी ऑस्ट्रलियन क्रिकेटपटू आहे. तिचा जन्म ३ नोव्हेंबर १९९० ला झाला. ती सध्या ऑस्ट्रलियाच्या महिला संघाचे प्रतिनिधित्व करते. मात्र १६व्या वर्षी ती ऑस्ट्रेलियाच्या क्रिकेट आणि फुटबॉल संघातून खेळी आहे. २००७ साली तिने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. सध्या संघातील युवतीपैकी एलिस ही एक आहे. तिने तिचे फुटबॉल प्रेमही जपले आहे. तिने ९७ वन-डे आणि ८२ टी२० सामन्यात ऑस्ट्रेलियाचे प्रतिनिधित्व केले आहे.

२. इशा गुहा

इशा ही इंग्लंडची महिला क्रिकेटपटू आहे. इशाचा जन्म बकिंगहॅमशायरमध्ये २१ मे १९८५ ला झाला. २००५ साली दक्षिण आफ्रिकेत झालेल्या महिला विश्वचषकात इंग्लंडच्या यशात तिचा महत्वाचा वाटा होता. २००९ सालच्या विश्वविजेत्या इंग्लंड संघात ती सहभागी होती. वयाच्या १७व्या वर्षी भारताविरुद्ध तिने कसोटी क्रिकेटमधून पदार्पण केले. ती मध्यमगती गोलंदाज असून तिने ८३ वन-डे सामन्यात एकूण १०१ गडी बाद केले आहेत. २०१२ पासून ईशा आयपीएलमध्ये सूत्रसंचालकाच्या भूमिकेत दिसत आहे.

३. मिताली राज

भारतीय महिला क्रिकेट संघाची कर्णधार मिताली राज हीदेखील सौंदर्यवतींच्या यादीत आपले स्थान राखून आहे. मितालीचा जन्म १९८२ साली जोधपूरला झाला. मितालीने १७व्या वर्षी भारतीय संघात पदार्पण केले. १९९९ साली तिने आयर्लंडविरुद्ध पहिला वन-डे सामना खेळला. त्या सामन्यात तिने ११४ धावा केल्या. २००५ साली झालेल्या विश्वचषक स्पर्धेत मितालीच्या नेतृत्वाखालील संघाने उपविजेपद मिळवले. तिने आतापर्यंत १९१ वन-डे सामन्यात ६,२९५ धावा केल्या आहेत. तर ७२ टी२० सामन्यात सुमारे २ हजार धावांच्या जवळ पोहोचली आहे.

४. सना मीर

पाकिस्तनाची कर्णधार सना मीर ही एक अतिशय सुंदर आणि कर्तृत्ववान क्रिकेटपटू आहे. तिचा जन्म ५ जानेवारी १९८६ला झाला. आशियाई खेळांमध्ये तिने २ वेळा पुरस्कार पटकावले आहेत. २००८ साली झालेल्या आयसीसी महिला विश्वचषक पात्रता स्पर्धेत तिला मालिकावीर या किताबाने गौरविण्यात आले होते. सनाचा जन्म काश्मिरात झाला. सना ही वकार युनिस, इम्रान खान आणि जॉन्टी ऱ्होड्स यांची प्रचंड मोठी चाहती आहे. तसेच, पाकिस्तान क्रिकेट मंडळाचा २०१३ साचा सर्वोकृष्ट महिला क्रिकेटपटूंचा पुरस्कारही तिला मिळाला आहे.

५. मेग लॅनिंग

मेगन मोहरा लॅनिंग म्हणजेच ‘मेग’ लॅनिंग हीच जन्म २५ मार्च १९९२ रोजी झाला. ती सध्या ऑस्ट्रेलियाच्या संघाचे प्रतिनिधित्व करत असून ती सलामीवीर आहे. २००९मध्ये तिने व्हिक्टोरीया संघाचे ६ टी२० सामन्यात प्रतिनिधित्व केले. तिने या संघातर्फे खेळताना १४२ चेंडूत १७५ धावांचा सर्वाधिक वैयक्तिक धावसंख्या उभारली. तिने आंतराराष्ट्रीय कारकिर्दीत ६६ वन-डे सामन्यात ३ हजारपेक्षा जास्त धावा केल्या आहेत तर ७४ टी२० सामन्यात २ हजाराहून अधिक धावा केल्या आहेत.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: These are top 5 beautiful female cricketers
First published on: 22-05-2018 at 17:04 IST