इंग्लंडविरुद्ध वानखेडे स्टेडियमवर खेळविणाऱया जाणाऱया कसोटी सामन्याच्या तिकीट दरात कपात करण्याचा निर्णय मुंबई क्रिकेट असोसिएशनकडून (एमसीए) घेण्यात आला आहे. यंदाच्या डिसेंबर महिन्यात ८ ते १२ डिसेंबर रोजी मुंबईच्या वानखेडेवर इंग्लंडविरुद्ध भारतीय संघाचा कसोटी सामना खेळविला जाणार आहे. या सामन्याचे तिकीट दर सचिनच्या निवृत्तीसाठी २०१३ साली वानखेडेवर आयोजित करण्यात आलेल्या वेस्ट इंडिजविरुद्धच्या सामन्याच्या तिकीट दरापेक्षाही कमी ठेवण्यात येणार आहेत.

एमसीएच्या कार्यकारिणीच्या झालेल्या बैठकीनंतर अध्यक्ष शरद पवार यांनी म्हणाले की, सचिन तेंडुलकरच्या अखेरच्या सामन्यासाठी वानखेडेवर जे तिकीट दर ठेवण्यात आले होते. त्यापेक्षाही कमी तिकीट दर डिसेंबरमध्ये इंग्लंडविरुद्ध खेळविल्या जाणाऱया कसोटी ठेवण्यात येतील. वानखेडेवरील सुनील गावस्कर स्टँडसाठी १०० रुपये इतके कमी तिकीट असेल तर सर्व पाच दिवसांसाठी ३०० रुपये इतका तिकीट दर असेल. याआधी हे दर २०० ते ५०० रुपयांच्या घरात होते. सचिन तेंडुलकर स्टँडमध्ये विशेष कक्षासाठी पाच दिवसांचे दहा हजार रुपये मोजून सर्व सुविधांचा लाभ घेता येणार आहे.