टोक्यो ऑलिम्पिकमध्ये भारताचा कुस्तीपटू बजरंग पुुनिया आपल्या सेमीफायनलच्या सामन्यात पराभूत झाला आहे.  बजरंगचा सामना तीन वेळचा विश्वविजेता आणि रिओ ऑलिम्पिकमधील कांस्यपदक विजेता अझरबैजानच्या हाजी अलीवशी झाला. या सामन्यात अझरबैजानच्या कुस्तीपटूने बजरंगला १२-५ ने पराभूत केले. याआधी कुस्तीपटू रवी दहियाने गुरुवारी भारतासाठी  रौप्यपदक जिंकले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

बजरंग पुनिया पहिल्या फेरीत १-४ ने पिछाडीवर होता. त्याने दुसऱ्या फेरीत काही चांगले डावपेच खेळले. मात्र हाजी अलीवने या फेरीतही गुण घेत आपली आघाडी वाढवली. दोन मिनिटे असताना बजरंगने चॅलेंज घेतले, पण ते अयशस्वी ठरले. बजरंगने उपांत्यपूर्व फेरीत आपल्या अनुभवाचा आणि कौशल्याचा चांगला वापर करून ६५ किलो वजनी गटात इराणच्या मुर्तझा चेका घियासीवर विजय नोंदवला होता. आशियाई स्पर्धेत कांस्यपदक विजेता असलेल्या मोर्तेजा आणि बजरंगमध्ये कडवी झुंज बघायला मिळाली.

 

हेही वाचा – मेजर ध्यानचंद यांना हिटलरने सलाम केला अन्…; ‘तो’ प्रस्ताव ध्यानचंद यांनी लावला होता धुडकावून

पुरुष फ्रीस्टाइल प्रकारात कुस्तीगीर बजरंग पुनियाच्या कामगिरीकडे देशाचे लक्ष होते. २०१६च्या रिओ ऑलिम्पिकला मुकल्यानंतर बजरंगने सगळ्याच आंतरराष्ट्रीय कुस्ती स्पर्धात आपला ठसा उमटवला. २०१८ आणि २०१९च्या विश्वचषक स्पर्धामध्येही त्याने एक रौप्य आणि एक कांस्यपदक जिंकले होते.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Tokyo 2020 wrestler bajrang punia semifinal bout update adn
First published on: 06-08-2021 at 14:54 IST