भारतीय महिला बॉक्सर पूजा राणीने पहिल्याच फेरीत अल्जेरियाच्या चाईब इचार्कचा पराभव केला. पाच पंचांनी पूजाला १० पैकी १० गुण दिले. पूजा ७५ किलो वजनी गटात खेळत आहे. इचार्कला हरवल्यामुळे पूजा उपांत्यपूर्व फेरीत पोहोचली. पदकांच्या सामन्यात खेळण्यासाठी ती आता एक पाऊल दूर आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

 

आशियाई चॅम्पियन आणि या ऑलिम्पिकसाठी पात्र ठरलेली पहिली भारतीय खेळाडू पूजा राणीने २० वर्षीय इचार्कला ५-० असे सहज हरवले. पूजाने तिच्या अनुभवाचा उपयोग करत इचार्क आणि सामन्यावर नियंत्रण राखले. या सामन्यात पूजाने संयम दाखवत नवख्या इचार्कला गुण मिळवण्याची संधी दिली नाही.

३० वर्षीय पूजा तिच्या सर्वोत्तम फॉर्मात आहे. मे महिन्यात झालेल्या आशियाई बॉक्सिंग चॅम्पियनशिप स्पर्धेत तिने सुवर्णपदक जिंकले होते. तत्पूर्वी मार्चमध्ये तिने विश्वविजेतीअथेन्या बायलनवर सरशी साधली होती. या बॉक्सम आंतरराष्ट्रीय स्पर्धेत तिने रौप्यपदक पटकावले होते.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Tokyo olympics boxer pooja rani defeats ichrak chaib of algeria in womens middleweight round of 16 adn
First published on: 28-07-2021 at 15:26 IST