बांगलादेशच्या संघाने कसोटी क्रिकेटमध्ये तब्बल 128 वर्ष अबाधित असलेल्या विक्रमाला गवसणी घातली आहे. ढाका येथे सुरु असलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात बांगलादेशने विंडीजवर 1 डाव आणि 184 धावांनी मात केली. या विजयासह बांगलादेशने कसोटी मालिकाही 2-0 ने आपल्या खिशात घातली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

या कसोटी सामन्याच्या पहिल्या डावात विंडीजचे पहिले 5 फलंदाज त्रिफळाचीत होऊन माघारी परतले. कसोटी क्रिकेटच्या इतिहासात 1890 साली ही घटना पहिल्यांदा घडली होती. यानंतर आजच्या दिवशी बांगलादेशने या विक्रमाला गवसणी घातली आहे. पहिल्या 5 विकेटपैकी फिरकीपटू मेहदी हसनने 3 तर अष्टपैलू खेळाडू शाकीब अल हसनने 2 विकेट घेतल्या. मेहदी हसनला सामनावीर तर शाकीब अल हसनला मालिकावीर पुरस्काराने गौरवण्यात आलं.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Top 5 batsmen dismissed bowled in a test innings after 128 years bangladesh creates history
First published on: 02-12-2018 at 16:24 IST