पी.व्ही.सिंधू, सायना नेहवाल या भारताच्या अग्रमानांकित बॅडमिंटनपटू आगामी राष्ट्रीय स्पर्धांमध्ये सहभागी होणार आहेत. २ ते ८ नोव्हेंबर रोजी नागपूर शहरात ही स्पर्धा खेळवली जाणार असल्याची माहिती बॅडमिंटन असोसिएशन ऑफ इंडियाचे अध्यक्ष हिम्मत बिस्वा शर्मा यांनी दिली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अवश्य वाचा – बॅडमिंटनमधील सुखावह बदल

“जेव्हा कधीही राष्ट्रीय स्पर्धांचं आयोजन केलं जातं, सिनीअर खेळाडू त्याकडे पाठ फिरवतात. गेली कित्येक वर्ष सायना राष्ट्रीय स्पर्धांमध्ये खेळली नाहीये. २०१० सालापासून मी सायनाला राष्ट्रीय स्पर्धेत खेळताना पाहिलचं नाहीये. त्यामुळे या स्पर्धेला मिळणारा प्रतिसाद पाहता बंगळुरुत सिनीअर खेळाडूंना राष्ट्रीय स्पर्धेत सहभागी होणं बंधनकारक करण्याचा निर्णय घेण्यात आला. यानूसार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी खेळाडूंशी चर्चा केली असता, त्यांनीही या स्पर्धेत खेळण्यास होकार दर्शवला आहे.” पत्रकारांशी संवाद साधताना शर्मा यांनी माहिती दिली.

याव्यतिरीक्त बॅडमिंटनसाठी राष्ट्रीय अकादमी उभारण्याकडे संघटेनाच कल असल्याचं शर्मा यांनी स्पष्ट केलंय. यासाठी सरकारकडे मदत मागितली जाणार असल्याचंही शर्मा यांनी सांगितलं. सध्या बॅडमिंटन असोसिएशनकडे पुलेला गोपीचंद आणि प्रकाश पदुकोण अकादमीचा अपवाद वगळता एकही राष्ट्रीय अकादमी नाहीये. इतर शहरात खेळाडू हे दुसऱ्या जागेत सराव करतात, त्यामुळे आगामी काळात खेळाडूंना अधिकाधिक सोयीसुवीधा उपलब्ध करुन देण्याचं मोठं काम संघटनेसमोर असल्याचं शर्मा यांचं म्हणणं आहे.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Top shuttlers will participate in senior nationals said bai chief
First published on: 11-09-2017 at 21:42 IST