‘आयपीएल’ स्पर्धा ट्विन्टी-२० सामन्यांची असल्याने गोलंदाजीत विविधता असणे अत्यंत गरजेचे ठरते. सामन्यात यशस्वी गोलंदाजी करण्यासाठीचा हाच एकमेव मंत्र असल्याचे चेन्नई सुपरकिंग्ज संघाचा अष्टपैलू खेळाडू रविंद्र जडेजाने म्हटले आहे.
जडेजा म्हणतो की, “परिस्थितीनुसार गोलंदाजी करणे महत्वाचे असते. चेंडु योग्य फिरकी घेत असेल, तर त्यावेळी केली जाणारी गोलंदाजी आणि ज्या खेळपट्टीवर फिरकी होण्यास कठीणता येत असेल त्यावेळी करावयाची गोलंदाजीत यात भरपूर फरक आहे. त्यामुळे परिस्थिती ओळखून गोलंदाजी करणे जमले पाहिजे. हाच यशस्वी गोलंदाजी करण्याचा मंत्र आहे.” तसेच सामन्यात जास्तीत जास्त चेंडु निर्धाव निघतील यावर माझा भर असून फिरकीच्या प्रमाणासोबत गोलंदाजीच्या गतीमध्येही एका षटकात विविधता असणे गरजेचे असल्याचेही जडेजाने म्हटले.