विश्वचषक २०१९ च्या पहिल्या उपांत्य सामन्यामध्ये न्यूझीलंडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारताकडून गोलंदाजीची सुरुवात भुवनेश्वर कुमारने केली. पहिल्याच चेंडूवर भारताना डीआरएस गमावला. त्यानंतरही भुवनेश्वरने सुरेख गोलंदाजी करत पहिल्या षटकात मार्टिन गप्टिलला एकही धाव घेऊ दिली नाही. हाच कारनामा दुसऱ्या षटकामध्ये जसप्रीत बुमराहने करुन दाखवला. त्याने हेन्री निकोल्सला निर्धाव षटक टाकले. पहिली दोन षटके निर्धाव टाकत न्यूझीलंडच्या फलंदाजांना भारतीय गोलंदाजांनी जखडून ठेवलं. दोन षटकानंतर न्यूझीलंडचा धावफलकावरील भोपळा फुटला नव्हता. अखेर तिसऱ्या षटकामध्ये न्यूझीलंडला पहिली धाव घेता आली. भुवनेश्वर आणि बुमराहच्या सुरेख गोलंदाजीमुळे पाच षटकांनंतर न्यूझीलंडची धावसंख्या अवघी पाच धावा इतकी होती आणि त्यांचा एक गडी तंबूत परतला होता.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

भारताच्या याच भन्नाट गोलंदाजीवर नेटकरी खूप खूष झाले असून अनेकांनी भुवनेश्वर-बुमराह जोडीला समाल करण्यासाठी आणि न्यूझीलंडच्या संघाची फिरकी घेणारे मिम्स ट्विटवर पोस्ट केले आहेत. यामध्ये अगदी इंग्लंडची राणी कोहिनूर हिऱ्याच्या मोबदल्यात बुमराह देण्याची मागणी करत असल्यापासून ते एक धाव काढल्यावर न्यूझीलंडचा मार्टिन गप्टिल खिचडी कार्यक्रमातल्या हंसाप्रमाणे ‘ए मे तो थक गई भाईसाहाब’ म्हणेपर्यंचे मिम्स व्हायरल केले आहेत. बुमराहच्या गोलंदाजीसमोर न्यूझीलंडच्या खेळांडूचा टिकाव लागणार नाही हे सांगण्यासाठी बुमराह गोलंदाजीला आल्यावर न्यूझीलंडच्या फलंदाजांची स्थिती दाखवताना सिक्रेड गेम्समधील गायतोंडेच्या मिम्सचा वापर करत ‘मैं नही बचेगा इधर, मर जाऐगा मै’ असं फलंदाज म्हणत असतील असही नेटकऱ्यांनी म्हटलं आहे. पाहुयात व्हायरल झालेले मिम्स…

दोन ओव्हरनंतर पहिली धाव काढल्यावर

आज इंग्लंड ५०० च्या मूडमध्ये आहे

अशी बॅट द्या त्यांना

गप्टिल एका धावेनंतर

बुमराहला असं खेळा

बुमराह विकेट कशा घेतो

बुमराहच्या गोलंदाजीचा सामना करताना न्यूझीलंडचे फलंदाज

कोहिनूर घ्या बुमराह द्या

येणार ना… घाबरणार तर नाही ना

बलिदान द्यावं लागेल

दरम्यान उपांत्य फेरीचा दुसरा सामना ११ जुलै रोजी ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडदरम्यान होणार आहे. त्यामुळेच आजचा सामना जिंकणारा संघ अंतिम फेरीमध्ये ऑस्ट्रेलिया किंवा इंग्लंडशी लढेल.

मराठीतील सर्व क्रिकेट वर्ल्ड कप 2019 बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Twitter praises bumrah bhuvaneshwar kumar with memes after 2 maiden overs against new zealand scsg
First published on: 09-07-2019 at 17:38 IST