गीता फोगट व बजरंग यांच्या रौप्यपदकांसह भारताने अमेरिकेतील डेव्ह शूल्ट्झ स्मृती चषक कुस्ती स्पर्धेत तीन पदकांची कमाई केली. गीताला ५९ किलो गटाच्या अंतिम लढतीत चीनच्या हुई लुई हिच्याविरुद्ध दुखापतीमुळे माघार घ्यावी लागली. पुरुषांच्या ६० किलो गटात डेव्हिन कार्टर याने बजरंग याला अंतिम फेरीत हरविले. ५५ किलो गटात संदीप तोमर याला कांस्यपदकावर समाधान मानावे लागले. गतवर्षी ५५ किलो गटात सुवर्णपदक जिंकणाऱ्या अमितकुमार याला यंदा या स्पर्धेतील दुसऱ्याच फेरीत पराभवास सामोरे जावे लागले. भारताचा ऑलिम्पिक रौप्यपदक विजेता सुशीलकुमार याने दुखापतीमुळे या स्पर्धेतून माघार घेतली होती.
संग्रहित लेख, दिनांक 4th Feb 2013 रोजी प्रकाशित
अमेरिकेतील कुस्ती स्पर्धेत भारताला दोन रौप्य व एक कांस्य
गीता फोगट व बजरंग यांच्या रौप्यपदकांसह भारताने अमेरिकेतील डेव्ह शूल्ट्झ स्मृती चषक कुस्ती स्पर्धेत तीन पदकांची कमाई केली. गीताला ५९ किलो गटाच्या अंतिम लढतीत चीनच्या हुई लुई हिच्याविरुद्ध दुखापतीमुळे माघार घ्यावी लागली. पुरुषांच्या ६० किलो गटात डेव्हिन कार्टर याने बजरंग याला अंतिम फेरीत हरविले.
First published on: 04-02-2013 at 01:31 IST
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Two silver and one bronze medals in wrestling compitition in america