युरोपचा फुटबॉल वर्ल्डकप म्हणून ओळखला जाणाऱ्या युरो कपला दणदणीत सुरुवात झाली. आज होणाऱ्या तीन सामन्यांपैकी दुसरा सामना फिनलँड आणि डेन्मार्क यांच्यात सुरू होता. ब गटात रंगणाऱ्या या सामन्यासाठी सर्वजण आतुरले होते. मात्र, सामन्यादरम्यान डेन्मार्कचा खेळाडू ख्रिश्चियन एरिक्सन मैदानावर कोसळल्याने हा सामना स्थगित करण्यात आला आहे. १९९२मध्ये डेन्मार्कच्या संघाने युरो कप जिंकला होता. प्रतिस्पर्धी संघावर कधीही वरचढ होणारा संघ म्हणून डेन्मार्कची ओळख आहे. कोपनहेगनच्या पार्कन स्टेडियमवर हा सामना खेळला जात होता.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

डेन्मार्कचा संघ – 

  • गोलकीपर : कॅस्पर श्माइकल
  • डिफेंडर्स : जोआकिम माएले, आंद्रियास क्रिसटेंसन, साइमन जाएर, डेनियल वास
  • मिड-फील्ड : ख्रिश्चियन एरिक्सन, थॉमस डेलाने, पिएरे एमिल होजबर्ग
  • फॉरवर्ड : मार्टिन ब्रेथवेट, जोनास विंड, यूसफ पॉलसेन

फिनलँडचा संघ – 

  • गोलकीपर : लुकास रादेकी
  • डिफेंडर्स : डेनियल ओ’शॉगनेसी, पाओलस अराजूरी, जूना तोइवियो, जेरे उरोनेन, जुक्का रायताला
  • मिड-फील्ड : ग्लेन कमारा, टिम स्पार्व, रॉबिन लॉड
  • फॉरवर्ड : तीमू पुक्की, जोएल पोहजनपालो

फिनलँडविरूद्ध डेन्मार्कचा संघ नेहमीच वरचढ राहिला आहे. २०११पासून या दोन्ही संघात एकही सामना झालेला नाही. पण, डेन्मार्कने फिनलँडला तब्बल ३८ वेळा मात दिली आहे. मागील वर्षी कास्पर हुलमंडला मॅनेजर बनल्यानंतर डेन्मार्कच्या कामगिरीत आणखी सुधारणा दिसून आली आहे. गेल्या वर्षी नेशन्स लीगमध्ये उत्कृष्ट कामगिरी केल्यावर, संघाने यंदाच्या फिफा विश्वचषक पात्रता गटातील त्यांचे तिन्ही सामने जिंकले. युरो कपच्या सराव सामन्यात संघाने जर्मनीबरोबर १-१अशी बरोबरी साधली आणि बोस्निया-हर्जेगोविनाचा पराभव केला.

हेही वाचा – अनुष्कासोबत असूनही विराटला आठवलं आपलं पहिलं प्रेम, इन्स्टाग्रामवर लिहिलं प्रेम पत्र!

 

दोन्ही संघामधील महत्त्वाचे मुद्दे

  • या सामन्यात डेन्मार्कचा संघ ४-३-३ आणि फिनलँडचा संघ ३-५-२ अशा फॉर्मेशनसह उतरू शकतो.
  • प्रमुख आणि मोठ्या स्पर्धेत डेन्मार्क आणि फिनलँड प्रथमच एकमेकांशी सामना करणार आहेत.
  • फिनलँड संघ प्रथमच एखाद्या प्रमुख स्पर्धेत खेळत आहे. त्याचबरोबर डेन्मार्कचा संघ नवव्या वेळी युरो कपमध्ये खेळणार आहे. २०१२ नंतर प्रथमच डेन्मार्क ही स्पर्धा खेळणार आहे.
  • मागील २२ सामन्यात डेन्मार्कचा संघ दोनपेक्षा जास्त गोल करू शकलेला नाही.

साधारणपणे दर चार वर्षांनी खेळली जाणारी ही स्पर्धा गतवर्षी होणे अपेक्षित होते. परंतु करोना साथीच्या पार्श्वभूमीवर क्रीडा क्षेत्र ठप्प पडल्यामुळे २०२१मध्ये युरो कप खेळवण्याचे ठरवण्यात आले. त्यातच प्रेक्षकांनाही मर्यादित संख्येत स्टेडियममध्ये प्रवेश देण्यात येणार आहे. करोनामुळे निर्माण झालेल्या तणावापूर्ण वातावरणाच्या पाश्र्वभूमीवर किमान पुढील एक महिना तरी क्रीडाप्रेमींना फुटबॉलचा रोमांच अनुभवायला मिळणार आहे. ११ जून ते ११ जुलै दरम्यान एकूण २४ संघांत खेळल्या जाणाऱ्या या स्पर्धेला ‘फिफा’ विश्वचषकाप्रमाणेच महत्त्व आहे.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Uefa euro 2020 denmark will face finland on parken stadium adn
First published on: 12-06-2021 at 20:19 IST