यूरो कप २०२० स्पर्धेत ‘ग्रुप ऑफ डेथ’ अशी ओळख असलेल्या ‘एफ’ गटात गतविजेत्या पोर्तुगालने शेवटच्या दहा मिनिटात चमत्कारिक खेळ करत हंगेरीला ३-० ने पराभूत केले. सामन्याच्या ८०व्या मिनिटांपर्यंत शांत असलेला पोर्तुगालचा कर्णधार  ख्रिस्तियानो रोनाल्डोने विक्रमी २ गोल करत स्टेडियममध्ये उपस्थित असलेल्या ६० हजारांपेक्षाही जास्त प्रेक्षकांची मने जिंकली. इस्रायलविरुद्धच्या मैत्रीपूर्ण सामन्यात रोनाल्डोने आपला १०४वा गोल नोंदवला होता. त्यामुळे हंगेरीविरुद्धची कामगिरी पकडून रोनाल्डोच्या खात्यात आता १०६ आंतरराष्ट्रीय गोल जमा झाले आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

दुसरे सत्र

दुसऱ्या सत्रातही दोन्ही संघांचा आक्रमकपणा कायम राहिला. ८०व्या मिनिटाला हंगेरीच्या शॉनने गोल केला, पण तो ऑफसाईड देण्यात आला. शेवटच्या १० मिनिटात मात्र सामन्याचे चित्र पालटले. पहिल्या सत्रात गोल करण्यात अपयशी ठरलेल्या राफेल गेरेरोने ८४व्या मिनिटाला पोर्तुगालसाठी पहिला गोल करत आघाडी घेतली. त्यानंतर ८५व्या मिनिटाला पोर्तुगालच्या सिल्वाला पाडल्यामुळे हंगेरीच्या ओर्बानला पिवळे कार्ड दाखवण्यात आले. त्यामुळे पेनल्टी किक मिळालेल्या पोर्तुगालने संधीचा फायदा उचलत सुपरस्टार ख्रिस्तियानो रोनाल्डोकरवी दुसरा गोल केला. यूरो कपसाठी रोनाल्डोने सर्वाधिक १०वा तर आंतरराष्ट्रीय फुटबॉलमध्ये १०५वा गोल नोंदवला. ९० मिनिटानंतर पाच मिनिटांचा अतिरिक्त वेळ देण्यात आला. अतिरिक्त वेळेत रोनाल्डोने आपला वैयक्तिक दुसरा आणि पोर्तुगालसाठी तिसरा गोल करत विजय निश्चित केला.

 

पहिले सत्र

गतविजेत्या पोर्तुगालने हंगेरीविषयी आश्वासक सुरुवात केली. सामन्याच्या सुरुवातीपासून त्यांनी हंगेरीच्या गोलकीपरजवळ फुटबॉल नेण्याचा प्रयत्न केला. १२व्या मिनिटाला राफेल गेरेरोला पोर्तुगालसाठी खाते उघडण्याची संधी मिळाली होती, पण त्याने ती सोडली. पहिल्या सत्रात पोर्तुगालच्या खेळाडूला पिवळे कार्ड दाखवण्यात आले. हंगेरीपेक्षा पोर्तुगालने ३ फाऊल जास्त केले. हंगेरीच्या नावावर ५ फाऊल नोंदवण्यात आले. पोर्तुगालने सर्वाधिक वेळा आपल्याकडे फुटबॉल ठेवला असला तरी, त्यांना पहिल्या सत्रात गोल नोंदवण्यात अपयश आले. त्यांचा स्टार खेळाडू ख्रिस्तियानो रोनाल्डोला एकदा गोल करण्याची संधी आली होती. मात्र, त्याने ती सोडली.

प्रमुख स्पर्धेत (वर्ल्डकप/यूरो कप) या दोघांमधील हा तिसरा सामना होता. १९६६च्या वर्ल्डकपमध्ये पोर्तुगालने हंगेरीविरुद्ध ३-१ने विजय मिळवला होता. त्याच वेळी २०१६च्या यूरो कपमध्ये दोघांमधील सामना ३-३ असा बरोबरीत सुटला होता.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Uefa euro cup 2020 portugal beat hungary adn
First published on: 15-06-2021 at 23:43 IST