भारताचा युवा गुणवान क्रिकेटपटू चेतेश्वर पुजाराची दखल अमेरिकेच्या क्रीडासंबंधित संकेतस्थळाने घेतली असली असून, अव्वल दहा युवा खेळाडूंच्या यादीमध्ये त्यांनी पुजाराचा समावेश केला आहे. या यादीमध्ये पुजाराबरोबर ब्राझिलच्या स्टार फुटबॉलपटू नेयमार आणि फॉम्र्युला वन शर्यतींमधला अव्वल चालक सबास्टियन वेटेल यांचाही समावेश करण्यात आला आहे.
‘स्पोर्ट्स ऑन अर्थ डॉट कॉम’ या संकेस्थळाने भविष्याचा विचार करून अव्वल दहा गुणवान युवा खेळाडूंची यादी जाहीर केली आहे. त्यांनी पुजाराला यादीत स्थान देताना म्हटले आहे की, सचिन तेंडुलकरने निवृत्ती पत्करली आहे, त्यानंतर भारतासाठी २५ वर्षीय पुजारा हा आशेचा किरण असेल. परदेशातील प्रसारमाध्यमांनी या यादीची दखल घेतली असून, या यादीमध्ये पुजारा आठव्या स्थानावर आहे. २१ वर्षीय नेयमारने या यादीमध्ये बाजी मारत अव्वल स्थान पटकावले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Us sports website puts indias prolific batsman cheteshwar pujara in top 10 sports investment options
First published on: 23-10-2013 at 01:24 IST