पहिला सेट गमावल्यानंतर जोमाने मुसंडी मारत अमेरिकेच्या व्हीनस विल्यम्सने शानदार खेळाचे प्रदर्शन करून अव्वल मानांकित कॅरोलिन वॉझ्नियाकीचा पराभव करत ऑकलंड क्लासिक टेनिस स्पर्धेच्या जेतेपदाला गवसणी घातली. सात वेळा ग्रँड स्लॅम विजेत्या असलेल्या व्हीनसचे हे कारकीर्दीतील ४६वे जेतेपद ठरले. दोन तास थरारक रंगलेल्या या लढतीत व्हीनसने २-६, ६-३, ६-३ असा विजय मिळवला. पहिल्या सेटमध्ये तिसऱ्या आणि पाचव्या गेममध्ये व्हीनसची सव्‍‌र्हिस भेदून वॉझ्नियाकीने पहिल्या नवव्या गेमपर्यंत सामन्यावर वर्चस्व मिळवले होते. मात्र व्हीनसने सुरेख खेळ करत जेतेपद खेचून आणले.