जांघेतील दुखापतीमुळे दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज व्हेरनॉन फिलँडर न्यूझीलंडविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्याला मुकणार आहे. शुक्रवारपासून सुरू होणाऱ्या दुसऱ्या कसोटी सामन्यासाठी फिलँडरच्या जागी रॉरी क्लेइनव्हेटला संधी देण्यात आली आहे. केपटाऊन येथील पहिल्या कसोटी सामन्यात फिलँडरने ३० षटकांत सात बळी मिळवण्याची किमया साधली होती. पहिला सामना सुरू असतानाच फिलँडरला गंभीर दुखापत झाली होती, त्यामुळे त्याला दुसऱ्या सामन्यात न खेळवण्याचा निर्णय निवड समितीने घेतला आहे.