राजकारण, हेवेदावे, लालसा, कुरघोडय़ा या सर्वावर मात करत बृहन्मुंबई शरीरसौष्ठव संघटना आणि मुंबई शरीरसौष्ठव संघटना यांनी खेळ आणि खेळाच्या विकासासाठी एकजूट दाखवत एकत्र येण्याचा अभूतपूर्व निर्णय घेतला आहे. महाराष्ट्र शरीरसौष्ठव असोसिएशनचे अध्यक्ष संजय मोरे आणि महाराष्ट्र राज्य असोसिएशनचे अध्यक्ष विजू पेणकर यांच्या नेतृत्त्वाखाली हा महत्त्वपूर्ण आणि खेळाला चालना देणारा निर्णय घेण्यात आला.
मुंबई शरीरसौष्ठव आणि फिटनेस असोसिएशन सर्वात जुन्या मानल्या जाणाऱ्या बृहन्मुंबई शरीरसौष्ठव असोसिएशनध्ये विलीन झाली आहे. या असोसिएशनच्या अध्यक्षपदी मनोहर पांचाळ आणि सरचिटणीसपदावर नंदू खानविलकर यांची निवड करण्यात आली आहे.
याबाबत संजय मोरे म्हणाले की, ‘‘खेळ आणि खेळाडूंचा विकास हे आमचे पहिल्यापासून ध्येय होते. त्यामुळे खेळ आणि खेळाडूंच्या विकासासाठी आम्ही कोणत्याही पदांची अट न ठेवता एकत्र आलो आहोत. यापुढे बरेच उपक्रम हाती घ्यायचे ठरवले असून नक्कीच त्याचा फायदा खेळासह खेळाडूंनाही होईल.’’
यावेळी महाराष्ट्र राज्य शरीरसौष्ठव संघटनेचे अध्यक्ष विजू पेणकर म्हणाले की, ‘‘मी गेली ६० वर्षे या विश्वात कार्यरत असून या खेळाच्या विकासासाठी आम्ही योग्य निर्णय घेतल्याचे समाधान आहे. आम्ही आमच्यापरीने खेळ आणि खेळाडूंचा विकास करूच, पण सरकारने खेळांसाठी जाहीर केलेल्या ११५ कोटी रुपयांच्या निधीतून आमच्या खेळाच्या वाटय़ाला काहीच आलेले नाही. आम्ही या खेळासाठी सर्वस्व अर्पण केले आहे. आता मुंबईबरोबरच मुंबई उपनगर आणि ठाण्यातही आम्ही एकत्रित येत आहोत. या एकजुटीचा खेळाबरोबरच खेळाडूंना नक्कीच फायदा होणार आहे.’’
संग्रहित लेख, दिनांक 20th Apr 2013 रोजी प्रकाशित
एकजुटीचा विजय असो!
राजकारण, हेवेदावे, लालसा, कुरघोडय़ा या सर्वावर मात करत बृहन्मुंबई शरीरसौष्ठव संघटना आणि मुंबई शरीरसौष्ठव संघटना यांनी खेळ आणि खेळाच्या विकासासाठी एकजूट दाखवत एकत्र येण्याचा अभूतपूर्व निर्णय घेतला आहे.
First published on: 20-04-2013 at 04:03 IST
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Victory should of unity