Haris Rauf coming to the field to bat without gloves and pads : बिग बॅश लीगच्या १२व्या हंगामात शनिवारी सिडनी थंडरचा सामना मेलबर्न स्टार्सशी झाला. या सामन्यात सिडनी थंडरने मेलबर्न स्टार्सचा ५ गडी राखून पराभव केला. प्रथम फलंदाजी करताना ग्लेन मॅक्सवेलच्या मेलबर्न स्टार्सने सिडनी थंडर्सला १७३ धावांचे लक्ष्य दिले, जे सिडनीने १८.२ षटकांत ५ गडी गमावून पूर्ण केले. अॅलेक्स हेल्सच्या ४० धावांच्या स्फोटक खेळीने सिडनीच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली. त्याने २६ चेंडूत ३ चौकार आणि ३ षटकारांच्या मदतीने ४० धावा केल्या. दरम्यान, या सामन्यातील हरिस रौफचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. सामन्यादरम्यान घडली एक विचित्र घटना - मेलबर्न स्टार्सच्या फलंदाजीदरम्यान एक विचित्र घटना पाहायला मिळाली. वास्तविक, पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज हरिस रौफ ग्लोव्हज आणि पॅडशिवाय फलंदाजीला आला होता. या घटनेने स्टेडियममधील प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले. यासाठी त्याची अंपायरने अडवणूकही केली होती, मात्र नंतर सामना सुरू ठेवण्यात आला होता. घटना अशी होती की, हारिस रौफ शेवटचा फलंदाज म्हणून फलंदाजीला आला होता. तेव्हा तो डावाचा शेवटचा चेंडू होता. हारिस रौफला नॉन-स्ट्रायकर एंडला जावे लागले आणि कदाचित त्यामुळेच तो पॅड आणि ग्लोव्हजशिवाय मैदानावर आला होता. हेही वाचा - VIDEO : कसोटी मालिकेसाठी टीम इंडिया सज्ज! रोहित-विराटने या ‘फॉरमॅट’बद्दल व्यक्त केल्या भावना, जाणून घ्या काय म्हणाले? चार विकेट पडल्यानंतर हरिस मैदानावर आला - मेलबर्न स्टार्सच्या डावातील शेवटच्या चार विकेट १७२ धावांवर पडल्या. ऑस्ट्रेलियाच्या ब्यू वेबस्टर, पाकिस्तानचा ओसामा मीर, ऑस्ट्रेलियाचा मार्क स्टीकेटी आणि इंग्लंडचा लियाम डॉसन यांच्या रूपाने संघाने शेवटचे चार विकेट गमावले. या चार विकेट डॅनियल सॅम्सच्या खात्यात गेल्या. त्याच धावसंख्येवर चार विकेट पडल्यानंतर डावाच्या शेवटच्या चेंडूवर हरिस रौफ फलंदाजीला आला होता. हरिसला पाहून सर्वजण आश्चर्यचकित झाले.