रोहित पवार यांनी आपल्या एक्स अकाऊंटवर एक कथित व्हिडिओ शेअर करत नवनीत राणांच्या सभेला हजर राहण्यासाठी पैसे वाटल्याचा आरोप केला होता. त्यावर प्रतिक्रिया देताना राहित पवार यांचा अमरावतीचा अभ्यास कमी आहे, असे रवी राणा म्हणाले होते. यावरून आता रोहित पवारांनी रवी राणा यांना प्रत्युत्तर दिलं आहे. तुम्ही कितीही पांघरून टाकण्याचा प्रयत्न केला, लोक एवढी खुळी नाही, असे म्हणाले, पुण्यात माध्यमांशी बोलताना त्यांनी संदर्भात प्रतिक्रिया दिली.

नेमकं काय म्हणाले रोहित पवार?

माझ्याकडे जो व्हिडिओ आला, तो मी सोशल मीडियावर पोस्ट केला होता. त्याबाबतीत आम्हाला काय वाटलं ते आम्ही बोललो, त्यावर त्यांना काय वाटलं हे त्यांनी सांगितले. पण पाणी देण्यासाठी त्यांनी एवढा खर्च केला असेल, तर त्यांनी त्यांच्या निवडणूक खर्चात तो खर्च दाखवला आहे का? हे सांगावे, अशी प्रतिक्रिया रोहित पवार यांनी दिली.

Mamata Banerjee slams governor
“तुमच्याकडे जेवणासाठी पैसे नाहीत का?”; टीएमसीच्या आमदारांना दंड ठोठाल्यानंतर ममता बॅनर्जींची राज्यपालांवर बोचरी टीका!
sushma andhare
“भाषण चुरचुरीत करण्यासाठी त्यांना उद्धव ठाकरेंचं नाव घ्यावं लागतं”, अमित शाह यांच्या ‘त्या’ टीकेला सुषमा अंधारेंचं प्रत्युत्तर!
Congress has also prepared a list of spokespersons to face the BJP
भाजपचा सामना करण्यासाठी काँग्रेसकडूनही प्रवक्त्यांची फौज
case registered against 22 including sharad pawar group mla jitendra awad at mumbra police station
आमदार जितेंद्र आव्हाडांसह २२ जणांवर गुन्हे दाखल; खोट्या गुन्ह्यात अडकविल्याचा तक्रारदारीत आरोप
Smriti Singh | स्मृती सिंग
“स्मृती सिंग यांनी प्रेमाच्या नावाखाली…”, शहीद अंशुमन सिंग यांच्या वडिलांचा गंभीर आरोप!
The young man direct request to Chief Minister Eknath Shinde regarding marriage
लग्नासाठी मुलगी मिळेना…तरुणाची थेट मुख्यमंत्र्यांना साद…फलकावर लिहिले, ‘लाडका भाऊ’ योजना…
principal, vehicle, female employees,
मानसिक त्रास देण्यासाठी प्राचार्यांनी दिले महिला कर्मचाऱ्यांच्या वाहनातील हवा सोडण्याचे आदेश, प्राचार्यांच्या अजब प्रतापाविरोधात….
Sharad Pawar VS Ajit Pawar
“अधून-मधून वारीला जाणाऱ्यांना हौशे-नवशे-गवसे म्हणतात”, रशियातील महिलेचा किस्सा सांगत शरद पवारांचा अजित पवारांना अप्रत्यक्ष टोला!

आज ते काहीही बोलले तरी तो पैसा कशासाठी होता, हे जगजाहीर आहे. असं असताना तुम्ही कितीही पांघरून टाकण्याचा प्रयत्न केला, तरी लोक एवढी खुळी नाहीत, त्यांना सगळं कळतं. भाजपाच्या काळात भाजपाचे नेते काय करत आहे, हे जनतेला माहिती आहे. सभेला कोणी येत नाही, त्यामुळेच पाचशे-सातशे रुपये दिले जातात. आणि त्या सातशे रुपयातही चारशे रुपये कमिशन घेतले जाते. हे बघितल्यानंतर अनेकांना आश्चर्य वाटणार नाही, अशी टीकाही त्यांनी केली.

हेही वाचा – सुनेत्रा पवारांबाबत केलेल्या ‘त्या’ विधानावरून धनंजय मुंडेंची शरद पवारांवर टीका; म्हण…

नेमकं प्रकरण काय?

अमरावतीच्या भाजपाच्या उमेदवार नवनीत राणा यांच्या प्रचारार्थ २४ एप्रिल रोजी अमरावतीत अमित शाह यांची सभा पार पडली होती. या सभेला उपस्थित राहण्यासाठी महिलांना पैसे वाटल्याचा कथित व्हिडिओ व्हायरल झाला होता. हा व्हिडिओ रोहित पवार यांनी त्यांच्या सोशल मीडियावर पोस्ट करत भाजपावर टीका केली होती. सगळीकडे कमिशन खाणारी पार्टी म्हणजे भाजपा आहे. त्यांना सभेला पैसे देऊन रोजाने माणसं आणावे लागतात हे आता जगजाहीर आहे. असे ते म्हणाले होते.

या टिकेला प्रत्युत्तर देताना “रोहित पवार यांना अमरावतीचा अभ्यास कमी आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या सभेसाठी लाखो महिला आल्या होत्या. या लाखो महिलांना पाणी वाटण्यासाठी आम्ही १०० ते १५० महिलांना काम दिले होते. जेणेकरून सभेला उपस्थित महिलांना जागेवरून उठावे लागणार नाही. पाणी पाजण्यासाठी त्यांना मानधन देण्यात आले होते. त्यासाठी ते पैसे वाटण्यात आले. तोच व्हिडिओ वारंवार दाखवला जात आहे. आता लाखोंच्या संख्येने एवढ्या कडक उन्हाळ्यात सभेला आलेल्या लोकांना पाणीही द्यायचे नाही का?”, असा सवाल करत रवी राणा यांनी स्पष्टीकरण दिले होते.