David Warner Scored a Century Celebrate Pushpa Style’s: एकदिवसीय विश्वचषक २०२३ मधील १८ व्या सामन्यात ऑस्ट्रेलियासमोर पाकिस्तानचे आव्हान आहे. बंगळुरूच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर दोन्ही संघ आमनेसामने आले आहेत. पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमने नाणेफेक जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतला. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करताना मिचेल मार्श आणि डेव्हिड वार्नच्या २५९ धावांच्या भागीदारी जोरावर ५० षटकांत ९ गडी गमावून ३६७ धावांचा डोंगर उभारला. या सामन्यात डेव्हिड वार्नरने शतक झळकावल्यानंतर पुष्पा स्टाईलने सेलिब्रेशन केले.

स्फोटक सलामीवीर डेव्हिड वॉर्नरचे दक्षिण भारतीय चित्रपटांवरील प्रेम कुणापासून लपलेले नाही. तो अनेकदा दक्षिण भारतीय चित्रपटांच्या गाण्यांवर डान्स करताना दिसतो. वॉर्नर हा साऊथचा सुपरस्टार अल्लू अर्जुनचा मोठा चाहता आहे. विश्वचषकात पाकिस्तानविरुद्ध शतक झळकावल्यानंतर त्याने मजेशीर पद्धतीने आनंद साजरा केला. वॉर्नरने शतक पूर्ण करताच त्याच्या ट्रेडमार्क शैलीत हवेत उडी मारून आनंद साजरा केला. यानंतर त्याने अल्लू अर्जुनच्या चित्रपटातील ‘पुष्पा स्टाईल’मध्ये सेलिब्रेशन करून चाहत्यांची मने जिंकली. त्याचा व्हिडीओ आता सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

Rajat Patidar's 4 Consecutive Sixes Video Viral
६,६,६,६…पाटीदारने मयंकच्या षटकात धावांचा पाऊस पाडत रचला इतिहास, आरसीबीसाठी ‘हा’ पराक्रम करणारा ठरला दुसरा खेळाडू
Mohit Sharma Unwanted Record
DC vs GT : ऋषभने धुलाई करताच, मोहित शर्मा ठरला IPL इतिहासातील सर्वात महागडा स्पेल टाकणारा गोलंदाज
Kolkata Knight Riders vs Delhi Capitals Match Highlights in Marathi
IPL 2024, DC vs KKR : कोलकाता नाईट रायडर्सचा मोठा विजय! दिल्ली कॅपिटल्सचा तब्बल १०६ धावांनी उडवला धुव्वा
Manoj Tiwary criticizes Glenn Maxwell
IPL 2024 : मॅक्सवेलच्या फ्लॉप शोवर माजी भारतीय खेळाडूची सडकून टीका; म्हणाला, ‘तो वेळोवेळी फक्त पगार घेतोय पण…’

ऑस्ट्रेलियाने पाकिस्तानला दिले ३६८ धावांचे लक्ष्य –

ऑस्ट्रेलियाने पाकिस्तानला ३६८ धावांचे लक्ष्य दिले. ऑस्ट्रेलियासाठी दोन्ही सलामीवीर फलंदाजांनी शतके झळकावली. डेव्हिड वॉर्नरने १६३ आणि मिचेल मार्शने १२१ धावा केल्या. या दोघांशिवाय अन्य कोणत्याही फलंदाजाला २५ धावांचा पल्ला गाठता आला नाही. मार्कस स्टॉइनिसने २१ धावा केल्या. जोश इंग्लिशने १३ धावांचे योगदान दिले.

हेही वाचा – AUS vs PAK: डेव्हिड वॉर्नरने शतक झळकावत सौरव गांगुलीसह पाच दिग्गजांना टाकले मागे, विराटच्या ‘या’ विक्रमाशी केली बरोबरी

मार्नस लाबुशेन आठ आणि स्टीव्ह स्मिथ सात धावा करून बाद झाला. पॅट कमिन्सने सहा आणि मिचेल स्टार्कने दोन धावा केल्या. ग्लेन मॅक्सवेल आणि जोश हेझलवूड खातेही उघडू शकले नाहीत. अॅडम झाम्पाने एका धाव काढून नाबाद परतला. पाकिस्तानकडून शाहीन आफ्रिदीने सर्वाधिक ५ विकेट्स घेत्या. तसेच हरिस रौफने तीन विकेट्स घेतल्या आणि उसामा मीरने एक विकेट घेतली.