scorecardresearch

Premium

LLC 2023 : लाइव्ह सामन्यात गौतम गंभीर आणि श्रीसंत भिडले, वादाचा VIDEO सोशल मीडियावर व्हायरल

Gautam Sreesanth Controversy : टीम इंडियाचा माजी वेगवान गोलंदाज श्रीसंतने गौतम गंभीरसोबत झालेल्या वादावर मौन सोडले आहे. क्रिकेटच्या मैदानावरील लाइव्ह सामन्यात गौतम गंभीरने वापरलेले शब्द पूर्णपणे अस्वीकार्य असल्याचे श्रीसंतचे म्हणणे आहे.

Gautam Gambhir S Sreesanth Sledging In LLC Eliminator Match
गौतम गंभीर आणि श्रीसंत यांच्यातील शाब्दिक वाद (फोटो-लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

Gautam Gambhir S Sreesanth Sledging In LLC Eliminator Match : भारतीय क्रिकेट संघाचा माजी स्फोटक सलामीवीर गौतम गंभीर सध्या लिजेंड्स लीग क्रिकेटमध्ये इंडिया कॅपिटल्सचे नेतृत्व करत आहे. या टूर्नामेंटमध्ये गंभीरची बॅट धावांचा पाऊस पाडत आहे. गुजरात जायंट्स आणि इंडिया कॅपिटल्स यांच्यातील पहिला एलिमिनेटर सामना अतिशय रोमांचक झाला. सुरतमध्ये खेळल्या गेलेल्या या सामन्यात गुजरात जायंट्सकडून खेळणारा गौतम गंभीर आणि टीम इंडियाचा माजी वेगवान गोलंदाज श्रीसंत यांच्यात वाद झाला. दोघांतील शाब्दिक वादाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

लालाभाई कॉन्ट्रॅक्टर स्टेडियमवर झालेल्या एलिमिनेटर सामन्यात गुजरात जायंट्स आणि इंडिया कॅपिटल्सचे संघ आमनेसामने होते. सामन्याच्या दुसऱ्या षटकात गौतम गंभीर स्ट्राइकवर असताना ही घटना घडली. वेगवान गोलंदाज एस श्रीसंत पहिले षटक टाकण्यासाठी आला होता. गंभीरने पहिला चेंडू सीमारेषेच्या बाहेर पाठवत षटकार मारला. त्यानंतर पुढच्या चेंडूवर चौकार मारला. पुढचा चेंडू डॉट होता. यानंतर श्रीसंत पुढे गेला आणि गंभीरकडे पाहू लागला. मग गंभीरनेही श्रीसंतला चोख प्रत्युत्तर दिले. मात्र, प्रकरण फार पुढे न घेऊन जाता दोघेही शांत झाले. श्रीसंतने ३ षटकात ३५ धावा देऊन १ विकेट घेतली.

DY Patil T20 Cup 2024 Updates in marathi
Hardik Pandya : आयपीएलपूर्वी हार्दिक पंड्याचे क्रिकेटच्या मैदानात पुनरागमन, ‘या’ संघाचे करतोय नेतृत्त्व
Sarfaraz Khan's fans angry with Virender Sehwag's pos
IND vs ENG : जुरेलच्या शानदार खेळीनंतर वीरेंद्र सेहवागने मीडियाकडे ‘ही’ मागणी केल्याने सर्फराझचे चाहते संतापले
India Vs England 3rd Test Rohit Sharma Video Viral
IND vs ENG : रोहित शर्माने बूट उचलला, अन् जैस्वाल-सर्फराझसह इंग्लंडचे खेळाडू फिरले माघारी, VIDEO व्हायरल
India Vs England 2nd Test pitch , Sourav Ganguly Questions
IND vs ENG : “मला अजूनही आश्चर्य वाटते की…”, दुसऱ्या कसोटीतील खेळपट्टी पाहून सौरव गांगुलीने उपस्थित केला प्रश्न

गौतम गंभीरने खेळली ५१ धावांची खेळी –

सामन्याबद्दल बोलायचे झाले, तर गौतम गंभीरच्या नेतृत्वाखाली इंडिया कॅपिटल्सने गुजरात जायंट्सचा १२ धावांनी पराभव केला. गंभीरने ३० चेंडूंत ७ चौकार आणि १ षटकाराच्या मदतीने ५१ धावांची खेळी केली. इंडिया कॅपिटल्सने प्रथम फलंदाजी करताना ७ बाद २२३ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात ख्रिस गेलच्या ८४ धावांच्या खेळीनंतरही गुजराजच्या संघाला विजयाची नोंद करता आली नाही. केविन ओब्रायनने ३३ चेंडूत ५७ धावांची खेळी केली. रस्टी थेरॉन आणि ईश्वर पांडे यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले.

हेही वाचा – ‘Handling the Ball’ म्हणजे काय? मुशफिकुर रहीमच्या विकेटवरून गोंधळ; जाणून घ्या आयसीसीचा संपूर्ण नियम

सामन्यानंतर श्रीसंतने शेअर केला व्हिडीओ –

सामन्यानंतर, श्रीसंतने सोशल मीडियावर त्याच्या अधिकृत इन्स्टाग्राम पेजवर एक व्हिडीओ शेअर केला. ज्यामध्ये तो म्हणाला की त्याला वीरू इत्यादी वरिष्ठ खेळाडूंबद्दल खूप आदर आहे. तो म्हणाला की यात माझी चूक नाही पण मिस्टर फायटर अर्थात गौतम गंभीरने क्रिकेटच्या मैदानावर लाइव्ह मॅचमध्ये जी भाषा वापरली होती, ती सहन करण्यासारखी नव्हती. भारतीय संघाचा माजी वेगवान गोलंदाज म्हणाला की, आज नाही तर उद्या गंभीर काय बोलला ते समोर येईल.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व क्रीडा, वर्ल्डकप २०२३ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Video of verbal altercation between gautam gambhir and sreesanth during eliminator match at llc 2023 went viral vbm

First published on: 07-12-2023 at 10:44 IST

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×