What is Obstructing the Field and Handling the Ball Rule : क्रिकेटविश्वात फंलदाज बाद होण्याचे अनेक मार्ग आहेत. गेल्या काही दिवसांपासून नवीन पद्धतींवर बरीच चर्चा होत आहे. गेल्या महिन्यात, एकदिवसीय विश्वचषक २०२३ दरम्यान, ‘टाइम आऊट’ नियम चर्चेत आला होता. आता बांगलादेश आणि न्यूझीलंड कसोटी मालिकेदरम्यान ‘हँडलिंग द बॉल’ नियम चर्चेत आला आहे. वास्तविक, हँडलिंग द बॉल म्हणजे चेंडू खेळल्यानंतर तो हाताने बाजूला टाकणे किंवा क्षेत्ररक्षणात अडथळा आणल्याने बाद घोषित केले जाते. आता ‘ऑब्स्ट्रक्टिंग द फील्ड’च्या नियमांतर्गत ढाका येथील कसोटी सामन्यादरम्यान बांगलादेशच्या मुशफिकुर रहीमला अशा प्रकारे बाद घोषित केले.

बांगलादेशने ४७ धावांवर ४ विकेट गमावल्या होत्या. यानंतर मुशफिकुर रहीमने डावाची धुरा सांभाळली. जेव्हा धावसंख्या १०४ पर्यंत पोहोचली होती, तेव्हा डावाच्या ४१ व्या षटकात, रहीमने काइल जेमिसनच्या ऑफ स्टंपच्या बाहेर जाणारा चेंडू खेळला आणि स्वत:च्या हाताने रोखला. यानंतर किवी खेळाडूंनी अपील केले आणि अंपायरने त्याला बाद घोषित केले. चेंडू हाताळताना मैदानात अडथळा आणल्याच्या गुन्ह्याखाली त्याला बाद घोषित केले. चला आता जाणून घेऊया पूर्ण नियम काय आहे?

Indian cricket team captain Rohit Sharma Virat Kohli failure against New Zealand vs india test match sport news
ऑस्ट्रेलिया दौरा अखेरचा? रोहित, विराटसह काही अनुभवी खेळाडूंच्या भविष्यावर प्रश्नचिन्ह
Who is Madhurima Raje?
Madhurima Raje : सतेज पाटील ज्यांच्यामुळे ढसाढसा रडले…
Ball tampering by India A players during the match against Australia A test match sports
भारत ‘अ’ संघावर चेंडूशी छेडछाड केल्याचे आरोप!
IND vs NZ Harbhajan Singh Statement
IND vs NZ : ‘भारतासाठी ‘ती’ गोष्ट शत्रू ठरतेय…’, मायदेशात पहिल्यांदाच कसोटीत व्हाइट वॉश झाल्यानंतर हरभजन सिंगचे मोठे वक्तव्य
IND vs NZ India suffered their first-ever home series whitewash in a three-match Test series, losing the third Test at the Wankhede Stadium in Mumbai by 25 runs on Sunday
IND vs NZ : टीम इंडियाचा सलग तिसऱ्या सामन्यात लाजिरवाणा पराभव! न्यूझीलंडने व्हाइट वॉश करत भारतात घडवला इतिहास
IND A vs AUS A Ishan Kishan in Trouble as India A team accused of ball tampering
IND A vs AUS A : धक्कादायक! ऑस्ट्रेलियात टीम इंडियावर ‘बॉल टॅम्परिंग’चा आरोप, पंचांशी वाद घातल्याने इशान किशन अडचणीत
IPL 2025 Retention Sanju Samson played big role in these RR retentions
IPL 2025 Retention : ‘रिटेन्शनमध्ये संजूची मोठी भूमिका…’, चहल-अश्विन आणि बटलरला रिलीज करण्याबाबत राहुल द्रविड यांचे मोठे वक्तव्य
IND vs NZ 3rd test Washington Sundar Bowled Hattrick against Rachin Ravindra
IND vs NZ : वॉशिंग्टन सुंदरने रचिन रवींद्रविरुद्ध नोंदवली हॅटट्रिक! सलग तिसऱ्या डावात उडवला त्रिफळा, VIDEO होतोय व्हायरल

‘ऑब्स्ट्रक्टिंग द फील्ड’ या पद्धतीने कधी बाद दिले जाते? ज्यावेळी फलंदाज चेंडू खेळतो आणि त्यानंतर तो चेंडू जर स्टंपवर जात असेल किंवा एखाद्या खेळाडूला झेल घेण्यात, धावबाद करण्यात फलंदाजाने अडथळा निर्माण केला, तर त्याला बाद दिले जाते. जेव्हा चेंडू खेळण्याच्या अ‍ॅक्शन किंवा गतीमध्ये असताना त्याच्याशी छेडछाड करण्याचा प्रयत्न होतो तेव्हा फलंदाजाला बाद दिले जाते.

हेही वाचा – ICC Rankings : राशिद खानला मागे टाकत रवी बिश्नोई ठरला टी-२० क्रिकेटमध्ये नंबर वन गोलंदाज, पाहा क्रमवारी

आयसीसीचा नियम काय सांगतो?

जर आयसीसीच्या नियमांबद्दल बोलायचे, तर २०१७ मध्ये ‘हँडलिंग द बॉल’साठी ‘ऑब्स्ट्रक्टिंग द फील्ड’ (ओबीसी) च्या अंतर्गत एक नियम बनवला गेला होता. तसे तर ओबीसीमध्ये बाद होण्याचे बरेच प्रकार आहेत, पण या नवीन प्रकाराचा २०१७ मध्ये समावेश झाला.

१.आयसीसीच्या घटनेच्या कलम ३७.१.१ नुसार, जर एखादा फलंदाज क्रिझच्या बाहेर असेल आणि क्षेत्ररक्षकाने फेकलेल्या (थ्रो) चेंडूच्या मार्गात अडथळा आणत असेल किंवा खेळाडूला शब्दांनी प्रभावित करत असेल तर त्याला बाद दिले जाते.

हेही वाचा – AUS vs PAK Test Series : बाबर आझमने धाव न घेताच केला चेंडू अडवण्याचा प्रयत्न, काय झालं नेमकं? पाहा VIDEO

२. आयसीसीच्या घटनेच्या कलम ३७.१.२ मध्ये असे नमूद केले आहे की, चेंडू खेळल्यानंतर स्ट्रायकरने बॅट नसलेल्या त्याच्या दुसऱ्या हाताने तो थांबवला किंवा पकडला तर त्याला ‘हँडलिंग द बॉल’ अंतर्गत बाद दिला जाऊ शकतो.

वरील दोन्ही गोष्टींचा विचार आयसीसीच्या नियमांतर्गत ऑब्स्ट्रक्टिंग द फील्ड अंतर्गत केला जातो. बॅटने चेंडू दोनदा मारण्याचा नियम आयसीसीच्या ३४ कायद्यानुसार येतो. २०१७ मध्ये त्याचे नियम बनल्यानंतर, पहिल्यांदाच कसोटी क्रिकेटमध्ये एखाद्या खेळाडूला अशाप्रकारे आऊट देण्यात आले. तर कसोटी क्रिकेटमध्ये २०१७ पूर्वी ‘हँडलिंग द बॉल’ अंतर्गत एकूण सात खेळाडूंना बाद देण्यात आले होते. आता मुशफिकुर रहीम हा अशा प्रकारे आऊट होणारा पहिला बांगलादेशी खेळाडू ठरला.