विंडीज विरुद्ध इंग्लंडमध्ये झालेल्या चौथ्या एकदिवसीय सामन्यात सर्वात जास्त षटकार मारण्याचा विक्रम झाला आहे. धडाकेबाज फलंदाजांनी भरलेल्या दोन्ही संघांनी मिळुन तब्बल ४६ षटकार मारले. यांत इंग्लंडने २४ षटकारांसह ४१८ धावा केल्या तर धावांचा पाठलाग करताना विंडीजने २२ षटकारांसह ३८९ धावा केल्या. दोन्ही संघांनी मिळुन तब्बल ८१७ धावांचा विक्रम केला. याआधी सर्वात जास्त षटकार मारण्याचा विक्रम भारत व ऑस्ट्रेलियाच्या नावावर होता. २०१३ मध्ये बंगळुरु स्टेडिअमवर झालेल्या सामन्यात दोन्ही संघांनी मिळुन ३८ षटकार मारले होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

 

ग्रेनाड स्टेडियमवर रंगलेल्या या सामन्यात विंडीजने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. इंग्लिश फलंदाजांनी सपाट खेळपट्टीचा फायदा उचलत ५० षटकांमध्ये तब्बल ४१८ धावांचा डोंगर रचला. यांत इंग्लिश फलंदाजांनी २४ षटकार मारले. पहिला डाव संपल्या नंतर आता क्रिकेट रसिकांच्या नजरा वेस्टइंडीजच्या ख्रिस गेलवर होत्या. त्यानेही आपल्या नावाप्रमाणेच तुफानी फलंदाजीचे प्रदर्शन केले. गेलने केवळ ९७ चेंडूत १६२ धावा केल्या. दरम्यान त्याने १४ षटकार मारले. परंतु गेल बाद झाल्यानंतर मात्र इंग्लिश गोलंदाजांच्या भेदक गोलंदाजीसमोर विंडीज फलंदाज टिकाव धरु शकले नाही आणि शेवटी त्यांनी २९ धांवांनी सामना गमावला. ग्रेनाड स्टेडियमवर रंगलेल्या या सामन्यात दोन्ही संघांनी मिळुन तब्बल ८१७ धावांचा विक्रम केला.

हा सामना विंडीजने गामावला असला तरी तडाखेबाज फलंदाजीसाठी ओळखल्या जाणाऱ्या ख्रिस गेलने दोन नव्या विक्रमांची नोंद केली. त्याने १६२ धावांसह एकदिवसीय क्रिकेटमध्ये १० हजार धावा करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत नाव मिळवले. तसेच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ५०० षटकार मारण्याचा विक्रमही केला.

 

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Video west indies vs england record 46 sixes 807 runs
First published on: 28-02-2019 at 14:39 IST