विजय हजारे क्रिकेट स्पर्धा

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आगामी  विजय हजारे करंडक क्रिकेट स्पर्धेसाठी महाराष्ट्राचे नेतृत्व युवा सलामीवीर ऋतुराज गायकवाडकडे सोपवण्यात आले आहे. २० फेब्रुवारीपासून सुरू होणाऱ्या एकदिवसीय प्रकाराच्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी महाराष्ट्र क्रिकेट संघटनेने २० सदस्यीय संघाची घोषणा केली.

गतवर्षी इंडियन प्रीमियर लीगमध्ये (आयपीएल) २४ वर्षीय ऋतुराजने दिमाखदार फलंदाजीच्या बळावर लक्ष वेधून घेतले होते. ड-गटात महाराष्ट्रासह दिल्ली, मुंबई, हिमाचल प्रदेश, राजस्थान आणि पुडिचेरी यांचा समावेश आहे.

महाराष्ट्राचा संघ :

ऋतुराज गायकवाड (कर्णधार), राहुल त्रिपाठी, अंकित बावणे, नौशाद शेख, केदार जाधव, अझिम काझी, निखिल नाईक (यष्टिरक्षक), विशांत मोरे (यष्टिरक्षक), सत्यजित बच्छाव, अक्षय पालकर, तरणजीत ढिल्लन, शामशुझ्मा काझी, प्रदीप दाढे, मुकेश चौधरी, मनोज इंगळे, राज्यवर्धन हंगर्गेकर, जगदीश झोपे, यश नाहर, यश क्षीरसागर, रणजीत निकम.

मुख्य प्रशिक्षक : संतोष जेधे.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Vijay hazare cricket tournament maharashtra is led by rituraj abn
First published on: 14-02-2021 at 00:09 IST