सट्टेबाजी प्रकरणी मुंबई पोलिसांच्या ताब्यात असलेल्या अभिनेता विंदू दारा सिंग रंधवा आणि गुरुनाथ मयप्पन यांच्यासह आठ जणांची मंगळवारी प्रत्येकी २५ हजार रुपयांच्या जामिनावर सुटका झाली. संध्याकाळी उशिरा ते आर्थर रोड तुरुंगामधून बाहेर पडले.
मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने १३ जणांना सट्टेबाजी प्रकरणी अटक केली होती. त्यापैकी विंदू, चेन्नई सुपर किंग्जचा मालक गुरुनाथ मयप्पन, सट्टेबाज प्रेम तनेजा, अल्पेश पटेल, रमेश व्यास, पांडुरंग कदम, अशोक व्यास, नीरज शहा यांची न्यायालयीन कोठडीची मुदत मंगळवारी संपली. त्यांनी किला न्यायालयात जामिनासाठी अर्ज केला होता. त्यावर निकाल देताना न्यायालयाने या चौघांची २५ हजार रुपयांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर सुटका केली.
दरम्यान, सट्टेबाज केशू पुणे याच्या पुणे येथील घरावर मुंबई पोलिसांनी छापा घालून त्याच्या घराची झडती केली. त्या झडतीत पोलिसांनी केशू पुणे याची डायरी आणि लॅपटॉप जप्त केला. या आरोपींविरोधात आम्ही ठोस पुरावे गोळा करत असून गरज पडल्यास त्यांच्यावरही ‘मोक्का’अंतर्गत कारवाई केली जाईल, असे पोलीस आयुक्त सत्यपाल सिंग यांनी सांगितले, तर सट्टेबाजाविरोधात पोलीस कडक कारवाई करत असून पहिल्यांदाच या आरोपींची १५ दिवसांची पोलीस कोठडी मिळाल्याचे त्यांनी सांगितले.
संग्रहित लेख, दिनांक 5th Jun 2013 रोजी प्रकाशित
विंदू, मय्यपनसह आठ जणांना जामीन
सट्टेबाजी प्रकरणी मुंबई पोलिसांच्या ताब्यात असलेल्या अभिनेता विंदू दारा सिंग रंधवा आणि गुरुनाथ मयप्पन यांच्यासह आठ जणांची मंगळवारी प्रत्येकी २५ हजार रुपयांच्या जामिनावर सुटका झाली. संध्याकाळी उशिरा ते आर्थर रोड तुरुंगामधून बाहेर पडले.
First published on: 05-06-2013 at 03:59 IST
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Vindu maiyapan with other eight got bail