भारताची आघाडीची कुस्तीपटू विनेश फोगटने वॉरसॉ येथे झालेली पोलंड खुली कुस्ती स्पर्धा जिंकून महिलांच्या ५३ किलो गटामधील सलग तिसऱ्या सुवर्णपदकाची नोंद केली. २४ वर्षीय विनेशने अंतिम सामन्यात पोलंडच्या रुक्सानाचा ३-२ असा पराभव केला. उपांत्यपूर्व सामन्यात विनेशने ऑलिम्पिक कांस्यपदक विजेत्या सोफिया मॅट्सनचा (स्वीडन) पराभव केला. गेल्या महिन्यात विनेशने स्पेनमधील ग्रां. प्रि. कुस्ती स्पर्धा आणि टर्की येथील यासर डोगू आंतरराष्ट्रीय स्पर्धा जिंकली होती.

कुस्तीमध्ये बलाढय़ प्रतिस्पर्धी असेल, तर त्यातून स्वत:च्या मर्यादेच्या पलीकडे जाण्याचा सकारात्मक धडा मिळतो. पोलंड बॉक्सिंग स्पध्रेतील कामगिरीबाबत अतिशय समाधानी आहे. ५३ किलो वजनी गटातील कामगिरी प्रेरणादायी आहे.      – विनेश फोगट