१ जूनपासून इंग्लंडमध्ये चॅम्पियन्स ट्रॉफीची थरार अनुभवायला मिळणार आहे. टीम इंडिया देखील चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी इंग्लंडमध्ये दाखल झाली आहे. ४ जून रोजी टीम इंडियाची पहिली लढत पाकिस्तान सोबत होणार आहे. स्पर्धेला सुरूवात होण्याआधी टीम इंडियाचं आज चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी फोटोशूट झालं.
फोटोशूटमध्ये टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीसह संघातील खेळाडूंनी सहभाग घेतला होता.
टीम इंडियाच्या खेळाडूंनी यावेळी धम्माल केली.
जसप्रीत बुमराह देखील फोटोशूटसाठी उपस्थित होता. डेथ ओव्हर स्पेशलीस्ट बुमराहनेही फोटोशूटचा आनंद लुटला.
टीम इंडियाचा उपकर्णधार अजिंक्य रहाणेचंही यावेळी फोटोशूट झालं.
त्याआधी टीम इंडियाने इंग्लंडमध्ये दाखल झाल्याच्या दुसऱ्याच दिवसापासून सरावाला सुरूवात केली.