scorecardresearch

VIDEO : विराट कोहली थिरकला डान्स फ्लोअरवर

आयपीएलमध्ये एकमेकांसमोर ठाकणाऱ्या विराट, ब्राव्हो, राहूल व हरभजननं एकत्र नाचगाण्याचा मजा लुटला

(छायाचित्र: विराटच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून)

नुकत्याच झालेल्या एका कार्यक्रमात विराट कोहलीनं ड्वेन ब्राव्हो, के. एल. राहूल व हरभजन सिंगसोबत डान्स फ्लोअरवर धमाल केली. ड्वेन ब्राव्होच्या रन दी वर्ल्ड व गेल्या वर्षीचं हिट गाणं चँपियन यावर राहूल व हरभजननं ठेका धरला होता, आणि न राहवलेल्या विराटनंही लगेच त्यांना डान्स फ्लोअरवर साथ दिली. आयपीएलमध्ये एकमेकांसमोर ठाकणाऱ्या या क्रिकेटपटूंनी एकत्र नाचगाण्याचा मजा लुटला.

https://www.instagram.com/p/Bho6QX0nVtg/

https://www.instagram.com/p/Bho7Ti0nk9T/

राजस्थान रॉयल्सच्या 218 धावांचा पाठलाग करताना विराटनं 26 चेंडूंमध्ये अर्धशतक झळकावलं, पण ते सामना जिंकण्यासाठी पुरेसं ठरलं नाही. आयपीएलमधलं हे कोहलीचं 31वं अर्धशतक. दक्षिण अफ्रिकेच्या दौऱ्यानंतर निदाहास ट्रॉफीसाठी कोहलीला विश्रांती देण्यात आली होती. दक्षिण अफ्रिकेच्या दौऱ्यात कोहलीनं 871 धावा केल्या.
कोलकाता व पंजाबच्या विरुद्ध कोहलीला फारशी चमक दाखवता आली नाही परंतु बेंगळुरूचा कप्तान असलेल्या विराटनं घरच्या मैदानावर राजस्थानचा मुकाबला करताना आपला फॉर्म परत आल्याचं दाखवून दिलं.

2016च्या मोसमात विराट तुफानी फॉर्ममध्ये होता. त्यानं 16 सामन्यांमध्ये चार शतकं व सात अर्धशतकं झळकावत 973 धावा केल्या होत्या. परंतु गेल्या मोसमात दुखापतीनं ग्रासलेला कोहली 10 सामने खेळला व त्यानं 308 धावा केल्या.

मराठीतील सर्व क्रीडा ( Krida ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Virat kohli hits the dance floor in an promotional event