सोशल मिडियावर कधी काय व्हायरल होईल सांगता येत नाही. मात्र त्यामुळेच सोशल मिडिया प्लॅटफॉर्मवर रोज नवीन नवीन व्हिडिओ, माहिती आणि फोटो पहायला मिळताता. प्रत्येकजण रोज काही ना काही गोष्टी या माध्यमातून शेअर करत असतात. अनेकदा व्हायरल झालेल्या व्हिडिओमधील व्यक्ती रातोरात सेलिब्रिटी होते. रानू मंडल यांच्या माध्यमातून असेच एक उदाहरण आपल्या सर्वांच्या समोर आहे. मात्र आता सोशल नेटवर्किंगवर एका लहान मुलाचा क्रिकेट खेळताना व्हिडिओ व्हायरल झाला आहे. विशेष म्हणजे इंग्लंड क्रिकेट संघाचा माजी कर्णधार केवीन पीटरसन आणि विराट कोहलीही हा व्हिडिओ पाहून थक्क झाले आहेत.

काय आहे या व्हिडिओमध्ये

या व्हिडिओमध्ये एक लहान मुलगा बॅटींग करताना दिसत आहे. हा लहान मुलगा चक्क डायपर घालून हातात ग्लोव्हज घालून हातातील प्लॅस्टीक बॅटने कव्हर ड्राइव्ह आणि स्ट्रेट ड्राइव्ह मारताना दिसत आहे. अनेकांना हा व्हिडिओ पाहून आश्चर्याचा धक्का बसाल आहे. इतक्या लहान वयामध्ये क्रिकेटमधील अवघड फटके हा मुलगा अगदी आरामात मारताना व्हिडिओमध्ये दिसत आहे.

हा व्हायरल झालेला व्हिडिओ अगदी केवीन पीटरसननेही शेअर करत कोहलीला या मुलाला भारतीय संघात घे असा सल्ला दिला आहे. “काय?????… विराट याला तुझ्या संघामध्ये घे. तू याला संघात घेशील ना?,” या कॅप्शनसहीत पीटरसनने हा व्हिडिओ शेअर केला आहे.

 

View this post on Instagram

 

WHAT?!?!?!?!?! Get him in your squad, @virat.kohli! Can you pick him?!?!

A post shared by Kevin Pietersen (@kp24) on

विराटनेही पीटरसनच्या या पोस्टची दखल घेत त्याला उत्तर दिले आहे. विराटने या मुलाच्या कौशल्याचे कौतुक केलं आहे. “हा मुलगा आहे कुठला? अशक्य कामगिरी आहे ही,” अशी कमेंट विराटने केली आहे.

दरम्यान, सध्या भारत विरुद्ध वेस्ट इंडीज मालिकेतील तिसरा सामना निर्णयाक ठरणार असल्याने त्यासाठी भारतीय संघ तयारी करत आहे. मालिकेमधील पहिला सामना वेस्ट इंडीजने आणि दुसरा भारताने जिंकला आहे.