दिल्लीच्या फिरोजशा कोटला मैदानातील अखेरची कसोटी अनिर्णीत राखण्यात श्रीलंकेला यश मिळाले. भारतीय संघाने मालिका जिंकली असली तरी कर्णधार विराट कोहलीला क्रिकेट मैदानातील एक मोठ्या विक्रमाने हुलकावणी दिली आहे. यंदाच्या कॅलेंडर वर्षात आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या मैदानात विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने तब्बल ३१ सामने जिंकले आहेत. नागपूरच्या मैदानातील कसोटी विजयानंतर विराट कोहलीने ऑस्ट्रेलियन कर्णधार रिकी पाँटिंगची बरोबरी केली होती. यापूर्वी एका कॅलेंडर वर्षात सर्वाधिक ३१ सामने जिंकण्याचा विक्रम रिकी पाँटिंगच्या नावे होता. त्याच्या नेतृत्वाखाली ऑस्ट्रेलियाने एका वर्षात ३१ सामने जिंकले आहेत. दिल्लीतील कसोटी सामना जिंकून विराटला हा विक्रम मोडण्याची संधी होती. मात्र, ती हुकली आहे.
चौथ्या दिवशी श्रीलंकेची ३ बाद ३१ अशी बिकट अवस्था झाल्यानंतर अखेरच्या दिवशी विराटच्या नावावर आणखी एक विक्रम प्रस्थापित होणार असे, वाटत होते. मात्र, धनंजया सिल्व्हाच्या नाबाद ११९ धावा आणि रोशन सिल्व्हाचे अर्धशतक आणि निरोशान डिक्वेला यांनी चिवट खेळी करत भारताच्या विजयावर पाणी फिरवले. या त्रिकुटामुळे श्रीलंकेला अखेरचा कसोटी सामना अनिर्णीत राखण्यात यश आले. कसोटी मालिकेनंतर भारत आणि श्रीलंका यांच्यात एकदिवसीय आणि टी-२० सामन्यांची मालिका रंगणार आहे. पण. या मालिकेत विराट मैदानात उतरणार नाही. भारताच्या नेतृत्वाची धुरा ही रोहित शर्माकडे देण्यात आली आहे.
आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या मैदानात एका वर्षात सर्वाधिक सामने जिंकण्याचा विक्रम हा ऑस्ट्रेलियन कर्णधार रिकी पॉंटिगच्या नावे आहे. २००५ मध्ये रिकी पाँटिगने ऑस्ट्रेलियाचे नेतृत्व करताना ४६ सामन्यात ३१ विजयाची नोंद केली होती. यात विश्वसंघाविरुद्धच्या सामन्याचाही समावेश आहे. विराट कोहलीने यावर्षी ४६ सामन्यात भारतीय संघाचे नेतृत्व केले आहे. यात विराटने देखील ३१ सामने जिंकण्याची नोंद करत रिकी पाँटिंगच्या विक्रमाशी बरोबरी साधली. याशिवाय सनथ जयसुर्याने २००१ मध्ये श्रीलंकेला ४६ सामन्यांपैकी