Anushka Sharma’s 35th Birthday: भारताचा स्टार क्रिकेटर विराट कोहलीची पत्नी अनुष्का शर्मा आज तिचा ३५ वा वाढदिवस सेलिब्रेट करत आहे. दरम्यान, विराट कोहलीने आपल्या सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत पत्नीला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. विराट कोहलीने त्याच्या पोस्टसोबत अनुष्काचे काही फोटोही शेअर केले आहेत. या छायाचित्रांसह कोहलीने खास कॅप्शन देत अनुष्काला तिच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.

विराटने न पाहिलेले फोटो शेअर केले –

विराट कोहलीने अनुष्का शर्माचे काही न पाहिलेले फोटो शेअर केले आहेत. त्याचबरोबर काही रोमँटिक फोटोही देखील पोस्ट केले आहेत. पत्नीला वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना विराटने लिहिले की, ‘प्रत्येक सुखात, प्रत्येक दुःखात, प्रत्येक कठीण प्रसंगात आणि तुझ्यावर प्रेम करतो. तू माझे सर्वस्व आहेस, वाढदिवसाच्या शुभेच्छा.”

anushkta sharma birthday husband virat kohli shares special post
अनुष्का शर्माच्या वाढदिवशी विराट कोहलीची खास पोस्ट; पत्नीबद्दल म्हणाला, “माझ्या आयुष्यात तू नसतीस तर…”
Rohit Sharma Shared Heart Wrenching Story of Daughter's Birth
लेकीच्या जन्मावेळी रोहित शर्मा पोहोचू शकला नाही, ‘हे’ दोन खेळाडू ठरले कारण; ५ वर्षांनी सांगितला मोठा प्रसंग
Salman Khan firing case Facebook account named Anmol Bishnoi was opened on same day of shooting
अभिनेता सलमान खान गोळीबार प्रकरण : गोळीबाराच्या दिवशीच अनमोल बिष्णोई नावाचे फेसबुक खाते उघडले
Pune Police Arrest Nigerian Woman in Mumbai for Mephedrone Smuggling
मेफेड्रोन तस्करी प्रकरणात पुणे पोलिसांची कामगिरी; मुंबईत नायजेरियन महिलेला अटक

अनुष्का शर्माने प्रतिक्रिया दिली –

कोहलीचा मेसेज शेअर होताच या पोस्टवर लाईक्सचा वर्षाव सुरू झाला. अवघ्या २० मिनिटांत ही पोस्ट १४ लाखांहून अधिक लोकांनी लाईक केली. हे फोटो चाहत्यांना खूप आवडली. दरम्यान, अनुष्का शर्मानेही या पोस्टवर प्रतिक्रिया देत हृदय, इनफिनिटी आणि कुटुंबाचा इमोजी पोस्ट केला आहे.

कोहलीसाठी अनुष्का सर्वस्व आहे –

विराट कोहलीने करिअरच्या प्रत्येक वळणावर आपल्या यशाचे श्रेय पत्नी अनुष्काला दिले आहे. तो म्हणतो की, अनुष्का आल्यानंतरच त्याचे आयुष्यात खूप बदल झाला. तिच्यामुळे प्रत्येक गोष्टींकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला. कोहली जेव्हा मोठी खेळी खेळतो तेव्हा तो आपल्या पत्नीच्या एंगेजमेंट रिंगला किस करून श्रेय देतो. खराब काळातही अनुष्कानेच विराटचे धैर्य वाढवले होते.

हेही वाचा – RR vs MI: शतकवीर यशस्वी जैस्वालला रोहित शर्माने विचारला मजेशीर प्रश्न; म्हणाला, “एवढी ताकद…”

विराट कोहली सध्या आयपीएल स्पर्धेत व्यस्त आहे. अनुष्का शर्मा देखील नुकतीच बंगळुरू स्टेडियमध्ये विराटला चिअर करताना दिसली होती. अनुष्का लवकरच चकदा एक्सप्रेसमध्ये दिसणार आहे. मुलगी वामिकाच्या जन्मानंतरचा हा तिचा पहिला चित्रपट आहे. नुकतेच तिने या चित्रपटाचे शूटिंग पूर्ण केले आहे. निर्माते लवकरच रिलीजची तारीख जाहीर करतील. हा चित्रपट नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे.