Wasim Akram and Gautam Gambhir slammed people for celebrating the defeat of India and Pakistan : एकदिवसीय विश्वचषक २०२३ च्या अंतिम सामन्यात भारताच्या पराभवामुळे पाकिस्तानचे लोक ऑस्ट्रेलियापेक्षा जास्त आनंदी आहेत. या विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताला पराभूत करून विश्वचषक जिंकला, पण तरीही पाकिस्तानमध्ये जेवढा आनंद साजरा केला जात होता, तेवढा ऑस्ट्रेलियातील लोक साजरा करत नाहीत. यावर आता वसीम अक्रम आणि गौतम गंभीर यांनी आपले मत मांडले आहे.

पाकिस्तानी जनतेचा आनंद पाहून असे वाटते की, अंतिम सामन्यात भारताला पराभूत करून पाकिस्तानने विश्वचषक जिंकला आहे, पण तसे नाही. अफगाणिस्तानने विश्वचषकाच्या सामन्यात पाकिस्तानचा पराभव केल्यानंतर भारतातही असेच घडले होते. त्यावेळी भारतातील लोकही अफगाणिस्तानपेक्षा जास्त आनंद साजरा करत होते.त्यामुळे भारत आणि पाकिस्तानचे क्रिकेट चाहते एकमेकांच्या पराभवाचा खूप आनंद साजरा करतात. या गोष्टीची चर्चा सुरू असताना पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू वसीम अक्रम आणि माजी भारतीय क्रिकेटपटू गौतम गंभीर यांनी असे करणे चुकीचे असल्याचे म्हटले आहे.

miller mathew
“दहशतवाद्यांना घरात घुसून मारू”, मोदींच्या वक्तव्यावर अमेरिकेची प्रतिक्रिया; म्हणाले, “भारत-पाक वादात आम्हाला…”
Sarabjit singh pakistan prisoner
बावीस वर्षे पाकिस्तान तुरुंगात हालअपेष्टा सोसलेल्या सरबजित सिंग यांच्या मारेकर्‍याची हत्या; नेमके हे प्रकरण काय होते?
Operation Meghdoot, Siachen,
विश्लेषण : पाकिस्तानला चकवा देत सियाचिनवर कब्जा… थरारक ‘ऑपरेशन मेघदूत’ मोहीम कशी फत्ते झाली?
Saudi Arabia and india
काश्मीरच्या समस्येवर सौदी अरेबियानं स्पष्ट केली भूमिका, दिली भारताला साथ

वर्ल्ड कप फायनलमध्ये भारताच्या पराभवानंतर स्पोर्ट्सकीडावरील एका कार्यक्रमात वसीम अक्रम म्हणाला, “तुम्ही निराश होऊ नका, कितीही वाईट दिवस असले तरी तुम्ही संपूर्ण स्पर्धेत अप्रतिम कामगिरी केली आहे आणि आताही आम्ही सर्वोत्तम संघ आहोत. ही गोष्ट लक्षात ठेवा. आम्ही स्वतः या टप्प्यातून १९९९ मध्ये गेलो आहोत, त्यावेळी सोशल मीडिया नव्हता, पण वर्तमानपत्र वाचत नव्हतो, टीव्ही पाहत नव्हतो, पण आजच्या काळात आपण सोशल मीडियापासून दूर राहणे, हे खूप कठीण आहे. भारत आणि पाकिस्तानचे लोक एकमेकांचा पराभव साजरा करतात, हे पाहून मला फक्त एकच उदाहरण आठवते, ‘बेगानी शादी में अबदुल्ला दीवाना.”

हेही वाचा – Virat Kohli: नाकावर पट्टी, कपाळावर आणि गालावर जखमेच्या खुणा, काय झालं विराटला? जाणून घ्या

एकमेकांच्या पराभवाचा आनंद साजरा करणे चुकीचे : गौतम गंभीर

वसीमच्या मताशी सहमती दर्शवताना गौतम गंभीरही याच कार्यक्रमात म्हणाला, “तुमचा विजय साजरा करा, इतरांच्या पराभवाचा आनंद साजरा करण्यात काही अर्थ नाही, मग तो भारत असो किंवा पाकिस्तान. जेव्हा पाकिस्तान हरतो, तेव्हा आमच्या इथे जल्लोष करतात. त्याचबरोबर जेव्हा भारत हरतो, तेव्हा पाकिस्तानमध्ये आनंद साजरा केला जातो. हे अत्यंत चुकीचे आहे. मला वाटते की ही गोष्ट बदलली पाहिजे, किमान खेळात तरी.”

हेही वाचा – IND vs AUS 2nd T20 : यशस्वी-इशान आणि ऋतुराजने रचला इतिहास! टी-२० मध्ये तीन भारतीयांनी पहिल्यांदाच केली ‘ही’ कामगिरी

वसीम अक्रम पुढे म्हणाला, “मी नावे घेणार नाही, पण या गोष्टीचा प्रचार करणारे दोन्ही देशात काही प्रसिद्ध लोक आहेत. तुम्ही तुमच्या देशासाठी देशभक्त आणि आम्ही आमच्यासाठी देशभक्त. ही गोष्ट इथेच संपवूया. जेव्हा सर्व संघर्ष करत आहेत, तेव्हा एकमेकांशी चांगले वागा. शेवटी, हा फक्त एक खेळ आहे.”