पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू वसीम अक्रमने पीसीबीचे माजी प्रमुख रमीझ राजाच्या कार्यकाळावर वक्तव्य केले आहे. तो म्हणावा हे पद केवळ माजी क्रिकेटपटूंसाठी आहे असे मला वाटत नाही. त्यानंतर रमीजवर निशाणा साधत तो म्हणाला की, तो ६ दिवसांसाठी आला होता आणि आता त्याच्या जागी परतला आहे. त्यांने पीसीबीचे विद्यमान प्रमुख नजम सेठी यांचे कौतुक करत त्यांना अनुभव असल्याचे सांगितले.
वसीम अक्रम क्रिकेट पाकिस्तानला म्हणाला, “बघा, मला यावर चर्चा करायची नाही. तो ६ दिवसांसाठी आला होता, आता तो त्याच्या जागी परतला आहे.” नजम सेठीबद्दल तो म्हणाला, “नजम सेठीकडे अनुभव आहे आणि केवळ क्रिकेटरच पीसीबीचे अध्यक्ष होऊ शकतात असे नाही. तुम्हाला एक चांगला प्रशासक असण्याची आवश्यकता आहे. तसेच तुम्हाला इतर मंडळांसोबत चांगली प्रतिष्ठा निर्माण करण्याची आवश्यकता आहे. यात नजम सेठी साहेब सर्वोत्तम आहेत. लोक माझ्या बोलण्याशी असहमत असतील. हे माझे मत आहे.”
रमीझ राजाने वसीम अक्रमवर साधला होता निशाणा –
पाकिस्तान क्रिकेट बोर्ड (पीसीबी) मधून हकालपट्टी झाल्यानंतर रमीझ राजा म्हणाला होता की, जर मी तिथे असतो तर वसीम अक्रमसह कोणत्याही क्रिकेटपटूवर, न्यायमूर्ती कय्युम यांच्या मॅच फिक्सिंगच्या अहवालात नाव आल्याने बंदी घालण्यात आली असती. गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये पाकिस्तान संघाला घरच्या कसोटी मालिकेत इंग्लंडविरुद्ध ३-० असा पराभव पत्करावा लागला. त्यानंतर रमीझ राजाला पीसीबीच्या अध्यक्ष पदावरून हटवण्यात आले.
क्रिकेटचे नुकसान होणार –
त्यानंतर रमीझ राजा युट्युब चॅनलवर म्हणाला होता, “जेव्हा तुमचा कार्यकाळ तीन वर्षांचा असेल आणि राजकीय हस्तक्षेपामुळे तुम्हाला एका वर्षानंतर पदावरून हटवले जाते, तेव्हा क्रिकेटचे नुकसान होते. सातत्य नाही आणि मागच्या दाराने लोक आणले जातात, तेव्हा दर्जा कसा सुधारणार नाही?