मुंबईचा सर्वात अनुभवी फलंदाज वासिम जाफर याचे वडील अब्दुल कादर जाफर यांचे दीर्घ आजाराने वांद्रे येथील लिलावती रुग्णालयात शुक्रवारी सकाळी निधन झाले. ते ७८ वर्षांचे होते. अब्दुल जाफर यांनी ‘बेस्ट’मध्ये बसचालक म्हणून नोकरी केली होती. तीन दिवसांपूर्वी मुंबईला रणजी करंडक जिंकून देण्यात जाफरने मोलाची कामगिरी केली. अंतिम सामन्यात शतक झळकावणाऱ्या जाफरने सामनावीराचा पुरस्कार पटकावला होता. वानखेडे स्टेडियमवर ६ फेब्रुवारीपासून होणाऱ्या इराणी करंडक स्पर्धेतील शेष भारत संघाविरुद्धच्या सामन्यासाठी जाफर मुंबईचे प्रतिनिधित्व करणार आहे.
संग्रहित लेख, दिनांक 2nd Feb 2013 रोजी प्रकाशित
वासिम जाफरला पितृशोक
मुंबईचा सर्वात अनुभवी फलंदाज वासिम जाफर याचे वडील अब्दुल कादर जाफर यांचे दीर्घ आजाराने वांद्रे येथील लिलावती रुग्णालयात शुक्रवारी सकाळी निधन झाले. ते ७८ वर्षांचे होते. अब्दुल जाफर यांनी ‘बेस्ट’मध्ये बसचालक म्हणून नोकरी केली होती.
First published on: 02-02-2013 at 03:36 IST
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Wasim jaffer father died at the lilavati hospital