टी २० वर्ल्डकप सुरू होण्यापूर्वीच वेस्ट इंडिज संघाला मोठा धक्का बसला आहे. संघातील अष्टपैलू खेळाडू फॅबियन एलन दुखापतीमुळे स्पर्धेला मुकाला आहे. टी २० प्रकारात एलनची गोलंदाजी आणि फलंदाजी चांगली आहे. त्यामुळे वेस्ट इंडिज संघाचं मोठं नुकसान होणार आहे. एलनऐवजी १५ खेळाडूंच्या चमुत आता अकील हुसैनला स्थान देण्यात आलं आहे. त्याचबरोबर राखीव खेळाडूंच्या यादीतही बदल करण्यात आला आहे. आता गुडाकेश मोटीला राखीव खेळाडूंमध्ये सहभागी करण्यात आलं आहे.

एलेनचा फलंदाजी स्ट्राइक रेट १३८ हून अधिक आहे. क्षेत्ररक्षणातही त्याने चांगली कामगिरी केली आहे. त्यामुळे त्याच्या नसण्याने वेस्ट इंडिज संघाचं नुकसान होणार आहे.

अफगाणिस्तान, भारत, पाकिस्तान, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, वेस्ट इंडिज, दक्षिण आफ्रिका आणि इंग्लंड या आठ संघांनी थेट सुपर १२ साठी पात्रता मिळवली आहे. सुपर १२चे सहा संघ अ आणि ब या दोन गटात विभागले गेले आहेत आणि प्रत्येक गटातील दोन संघ उपांत्य फेरीसाठी पात्र ठरतील.

वेस्ट इंडिज
कायरन पोलार्ड (कप्तान), निकोलस पूरन, ख्रिस गेल, अकिल हुसैन, ड्वेन ब्राव्हो, रोस्टन चेस, आंद्रे फ्लेचर, शिमरॉन हेटमायर, एविन लुईस, रवी रामपॉल, आंद्रे रसेल, लेंडल सिमन्स, अल्फोन्सो थॉमस, हेडन वॉल्श.

राखीव : डॅरेन ब्राव्हो, शेल्डन कॉटरेल, जेसन होल्डर, गुडाकेश मोटी