किरॉन पोलार्ड आणि दिनेश रामदिन यांच्या दमदार खेळींच्या जोरावर वेस्ट इंडिजने पहिल्या एकदिवसीय सामन्यात बांगलादेशवर तीन विकेट्स आणि ६२ चेंडू राखून विजय मिळवला. पहिल्यांदा फलंदाजी करताना बांगलादेशने अनिमुल हकच्या १०९ धावांच्या खेळीच्या जोरावर २१७ धावा उभारल्या.
या आव्हानाचा पाठलाग करताना बांगलादेशने भेदक गोलंदाजीच्या जोरावर वेस्ट इंडिजची ५ बाद ३४ अशी अवस्था केली होती. पण त्यानंतर रामदिन (७४) आणि पोलार्ड (८९) यांनी सहाव्या विकेटसाठी १४५ धावांची भागीदारी रचत संघाच्या विजयात मोलाचा वाटा
उचलला. पोलार्डला यावेळी सामनावीराचा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
संग्रहित लेख, दिनांक 22nd Aug 2014 रोजी प्रकाशित
पोलार्ड, रामदिनच्या खेळींमुळे वेस्ट इंडिज विजयी
किरॉन पोलार्ड आणि दिनेश रामदिन यांच्या दमदार खेळींच्या जोरावर वेस्ट इंडिजने पहिल्या एकदिवसीय सामन्यात बांगलादेशवर तीन विकेट्स आणि ६२ चेंडू राखून विजय मिळवला.
First published on: 22-08-2014 at 01:02 IST
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: West indies beat bangladesh by 3 wickets in 1st odi