मार्लन सॅम्युएल्सने झळकावलेल्या एकमेव द्विशतकी खेळीमुळे वेस्ट इंडिजने तिसऱ्या दिवसअखेर ४ बाद ५६४ असा धावांचा डोंगर उभा केला आहे. त्यामुळे बांगलादेशविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात वेस्ट इंडिजने पहिल्या डावात १७७ धावांची महत्त्वपूर्ण आघाडी घेतली आहे.
सॅम्युएल्स आणि शिवनारायण चंदरपॉल यांनी चौथ्या विकेटसाठी १७७ धावांची भर टाकली. प्रत्येक सत्रात घणाघाती खेळी करणाऱ्या सॅम्युएल्सने ३१ चौकार आणि तीन षटकारांसह कारकीर्दीतील सर्वोत्तम २६० धावा फटकावल्या. चंदरपॉल १०९ तर दिनेश रामदिन चार धावांवर खेळत आहे. चंदरपॉलने कसोटीतील २७वे शतक साजरे केले.
संग्रहित लेख, दिनांक 24th Nov 2012 रोजी प्रकाशित
वेस्ट इंडिजकडे १७७ धावांची आघाडी
मार्लन सॅम्युएल्सने झळकावलेल्या एकमेव द्विशतकी खेळीमुळे वेस्ट इंडिजने तिसऱ्या दिवसअखेर ४ बाद ५६४ असा धावांचा डोंगर उभा केला आहे. त्यामुळे बांगलादेशविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात वेस्ट इंडिजने पहिल्या डावात १७७ धावांची महत्त्वपूर्ण आघाडी घेतली आहे.

First published on: 24-11-2012 at 03:31 IST
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: West indies on lead with 177 runs