Highest successful run chase at oval: भारत आणि इंग्लंड पाचवा कसोटी सामना अंतिम टप्प्यात पोहोचला आहे. भारतीय संघाने दुसऱ्या डावात उत्कृष्ट फलंदाजी करत भारताला सर्वात मोठी धावसंख्या उभारून दिली आहे. यशस्वी जैस्वाल आणि आकाशदीपच्या १०७ धावांच्या भागीदारीने या मोठ्या धावसंख्येचा पाया रचला आणि सर्वांच्या योगदानाने भारताने पहिल्या डावात ३९६ धावा उभारल्या आहेत.
भारताने ओव्हल कसोटीत ३९६ धावा केल्या आहेत. यासह इंग्लंडला विजयासाठी ३७४ धावांचं सर्वात मोठं योगदान दिलं आहे. इंग्लंडला जर पाचव्या कसोटीत विजय मिळवायचा असेल तर १२३ वर्षे जुना विक्रम मोडावा लागणार आहे.
ओव्हलच्या मैदानावर आतापर्यंत कधीही ३०० पेक्षा जास्त धावांचे लक्ष्य गाठता आलेलं नाही. या मैदानावर चौथ्या डावात २०० पेक्षा जास्त धावांचे लक्ष्य फक्त सहा वेळा गाठण्यात आलं आहे. अखेरच्या वेळेस २०२४ मध्ये श्रीलंकेने ओव्हल कसोटीत इंग्लंडविरुद्ध २१९ धावांचे लक्ष्य गाठले होते. इंग्लिश संघाने १९९४ मध्ये या मैदानावर २०० पेक्षा जास्त धावांचे लक्ष्य गाठले होते. त्यांनी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध हा पराक्रम केला होता.
१२३ वर्षांपूर्वी इंग्लंडच्या मैदानावर सर्वात यशस्वी लक्ष्य गाठलं
ओव्हलवर गाठण्यात आलेलं २६३ हे सर्वोच्च लक्ष्य आहे. इंग्लंडने १९०२ मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या अॅशेस मालिकेत हे लक्ष्य यशस्वीपणे गाठलं होतं. त्यावेळेस इंग्लिश संघाने एका विकेटने विजय मिळवला होता. तेव्हापासून ओव्हलच्या मैदानावर २०० पेक्षा जास्त धावांचं लक्ष्य फक्त पाच वेळा पार केलं गेलं आहे, परंतु केवळ एकदाच धावसंख्येचा आकडा २५० च्या पलीकडे गेला आहे. १९६३ मध्ये वेस्ट इंडिजने इंग्लंडविरुद्ध २५३ धावांनी विजय मिळवला.
ओव्हलच्या मैदानावरील विजयासाठी सर्वाच्च लक्ष्य गाठण्याचा रेकॉर्ड
२६३ धावा – इंग्लंड वि. ऑस्ट्रेलिया- इंग्लंड विजयी – १९०२
२५३ धावा – वेस्ट इंडिज वि. इंग्लंड – वेस्ट इंडिज विजयी – १९६३
२४२ धावा – ऑस्ट्रेलिया वि. इंग्लंड – ऑस्ट्रेलिया विजयी – १९७२
२२५ धावा – वेस्ट इंडिज वि. इंग्लंड – वेस्ट इंडिज विजयी – १९८८
२१९ धावा – श्रीलंका वि. इंग्लंड – श्रीलंका विजयी – २०२४
२०४ धावा – इंग्लंड वि. दक्षिण आफ्रिका – इंग्लंड विजयी – १९९४