When And Where To Watch WTC Final: विश्व कसोटी अजिंक्यपद २०२५ स्पर्धेचा अंतिम सामना सुरू व्हायला अवघे काही तास शिल्लक राहिले आहेत. या स्पर्धेचा अंतिम सामना दोन वर्षानंतर होत असतो. गेल्या दोन्ही हंगामात भारतीय संघाने अंतिम फेरीत प्रवेश केला होता. मात्र, दोन्ही वेळेस भारतीय संघाला पराभव पत्करावा लागला. यावेळी गतविजेता ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेचा संघ अंतिम फेरीत भिडणार आहेत. हा सामना केव्हा, कुठे आणि कधी होणार? जाणून घ्या संपूर्ण माहिती.
पॅट कमिन्सच्या नेतृत्वाखाली खेळणारा ऑस्ट्रेलियाचा संघ सलग दुसऱ्यांदा ही ट्रॉफी आपल्या नावावर करण्याच्या प्रयत्नात असणार आहे. २०२३ मध्ये झालेल्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारतीय संघाला पराभूत करून जेतेपदाची ट्रॉफी उंचावली होती. तर दुसरीकडे दक्षिण आफ्रिकेने पहिल्यांदाच या स्पर्धेतील अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. दक्षिण आफ्रिका संघाच्या नेतृत्वाची जबाबदारी टेम्बा बावुमाकडे असणार आहे.
अंतिम फेरीचा सामना कोणत्या २ संघांमध्ये रंगणार आहे?
विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया या दोन्ही संघांमध्ये रंगणार आहे.
विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना कुठे होणार आहे?
विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना लॉर्ड्सच्या मैदानावर रंगणार आहे.
विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना केव्हा सुरू होणार?
हा सामना ११ जून ते १५ जून दरम्यान खेळवला जाणार आहे. तर १६ जून हा राखीव दिवस असणार आहे.
किती वाजता सुरू होणार सामना?
हा सामना स्थानिक वेळेनुसार सकाळी १०:३० वाजता सुरू होईल. तर भारतीय वेळेनुसार हा सामना दुपारी ३:३० वाजता सुरू होईल.
विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत ऑस्ट्रेलिया संघाची कामगिरी (२०२३–२५)
एकूण सामने –१९
जिंकलेले सामने –१३
पराभव –४
ड्रॉ – २
विजयाची सरासरी –६७.५४ टक्के
या स्पर्धेत दक्षिण आफ्रिकेची कामगिरी
एकूण सामने –१२
विजय –८
पराभव –३
ड्रॉ –१
विजयाची सरासरी – ६९.४४
कुठे पाहता येणार लाईव्ह?
तुम्ही भारतात ही स्पर्धा स्टार स्पोर्ट्स आणि जियो सिनेमावर लाईव्ह पाहू शकता. तर ऑस्ट्रेलियात ही स्पर्धा ऍमेझॉन प्राईमवर लाईव्ह पाहता येणार आहे. तसेच दक्षिण आफ्रिकेतील क्रिकेट चाहते हा सामना सुपरस्पोर्ट टीव्हीवर लाईव्ह पाहू शकतील