Which Teams Have How Much Money for IPL 2024 Auction : इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) च्या १७ व्या आवृत्तीचा लिलाव सुरू होण्यासाठी दोन दिवस बाकी आहेत. चाहते या लिलावाची आतुरतेने वाट पाहत आहेत. आयपीएल २०२४ चा लिलाव १९ डिसेंबर रोजी दुबईत होणार आहे. पहिल्यांदाच आयपीएलचा लिलाव परदेशात होणार आहे. या लिलावासाठी सर्व संघांच्या पर्सची रक्कम आणि खरेदीसाठी उपलब्ध स्लॉट आता निश्चित करण्यात आले आहेत. त्यामुळे लिलावापूर्वी प्रत्येक संघाकडे किती पैसे आणि उपलब्ध स्लॉट आहेत ते आपण जाणून घेऊया.
कोणत्या संघाकडे किती पैसे आहेत?

गुजरात टायटन्स संघ या बाबतीत आघाडीवर आहे. लिलावासाठी गुजरातच्या पर्समध्ये सर्वाधिक रक्कम आहे. बघू कोणाकडे किती पैसे आहेत.

yavatmal evm machines marathi news
३६ दिवस जागते रहो…! शासकीय गोदामात ‘ईव्हीएम’ कडेकोट बंदोबस्तात राहणार
sharad pawar manifesto
Video: शरद पवार गटाचा जाहीरनामा प्रकाशित; जातनिहाय जनगणना, महिला आरक्षणासह ‘या’ प्रमुख मुद्द्यांचा केला समावेश!
Recruitment for assistant professor post
मुंबईच्या TISS मध्ये ‘या’ पदासाठी भरती होणार! २८ एप्रिलआधी करा अर्ज, जाणून घ्या पात्रता निकष
National Consumer Commission hearings,
राष्ट्रीय ग्राहक आयोगातील सर्वसुनावण्या १५ एप्रिलपासून ऑनलाईन!

गुजरात टायटन्स – ३८.१५ कोटी
सनरायझर्स हैदराबाद – ३४ कोटी
केकेआर – ३२.७ कोटी
चेन्नई सुपर किंग्ज – ३१.४ कोटी
पंजाब किंग्ज – २९.१ कोटी
दिल्ली कॅपिटल्स- २८.९५ कोटी
आरसीबी – २३.२५ कोटी
मुंबई इंडियन्स – १७.७५ कोटी
राजस्थान रॉयल्स – १४.५ कोटी
लखनऊ सुपर जायंट्स – १३.१५ कोटी

कोण-कोणत्या संघाकडे किती स्लॉट शिल्लक आहेत?

केकेआर – १२ स्लॉट (४ विदेशी)
चेन्नई सुपर किंग्ज- ६ स्लॉट (३ विदेशी)
सनरायझर्स हैदराबाद – ६ स्लॉट (३ विदेशी)
आरसीबी – ६ स्लॉट (३ विदेशी)
लखनऊ सुपर जायंट्स- ६ स्लॉट (२ विदेशी)
गुजरात टायटन्स- ८ स्लॉट (२ विदेशी)
पंजाब किंग्ज- ८ स्लॉट (२ विदेशी)
मुंबई इंडियन्स- ८ स्लॉट (४ विदेशी)
राजस्थान रॉयल्स- ८ स्लॉट (३ विदेशी)
दिल्ली कॅपिटल्स- ९ स्लॉट (४ विदेशी)

हेही वाचा – IPL 2024 : सचिन तेंडुलकर मुंबई इंडियन्सच्या मेंटॉरपदावरुन पायउतार? सोशल मीडियावर चर्चेला उधाण

आयपीएल २०२४ चा लिलाव कधी आणि कुठे होणार?

आयपीएल २०२४ चा लिलाव मंगळवार, १९ डिसेंबर रोजी दुबईत होणार आहे. दुबईतील कोका-कोला एरिना येथे याचे आयोजन केले जाईल. भारतीय वेळेनुसार दुपारी २.३० वाजता (स्थानिक वेळेनुसार दुपारी १ वाजता) लिलाव सुरू होईल. चाहते स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर हा लिलाव लाइव्ह पाहू शकतात, तर ओटीटीवर चाहते Disney Plus Hotstar द्वारे लाइव्ह आनंद घेऊ शकतात. या लिलावासाठी एकूण ३३३ खेळाडूंनी आपली नावे दिली आहेत. तर एकूण ७७ खेळाडूंनाच बोली लावता येणार आहे.