Mumbai Indians IPL 2024 Updates : सध्या आयपीएल स्पर्धेतील मुंबई इंडियन्सचा संघ विविध घडामोडींमुळे चर्चेत आहे. त्यामुळे इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल २०२४) चा १७ वा हंगाम सुरू होण्यापूर्वीच प्रसिद्धीच्या झोतात आला आहे. आयपीएल २०२१४ साठी १९ डिसेंबर रोजी होणाऱ्या लिलावापूर्वीच अशा अनेक घटना घडल्या ज्यामुळे ही जगातील सर्वात महागडी टी-२० लीग चर्चेत आली आहे. हार्दिक पंड्या गुजरात सोडून मुंबई इंडियन्समध्ये परतणे, रोहित शर्माच्या जागी हार्दिकची मुंबईचा कर्णधार म्हणून नियुक्ती ही आत्तापर्यंतची सर्वात मोठी बातमी आहे. आता सचिन तेंडुलकरशी संबंधित एक बातमी सोशल मीडियावर खूप ट्रेंड करत आहे.

मुंबई इंडियन्सच्या कर्णधारपदावरून रोहित शर्माला हटवण्यात आल्याच्या निराशेतून क्रिकेट चाहते अद्याप सावरलेले नाहीत, अशात सोशल मीडियावर सचिन तेंडुलकरशी संबंधित एक बातमी ट्रेंड होत आहे. रोहितला कर्णधारपदावरून हटवल्यानंतर सचिन तेंडुलकरनेही मुंबई इंडियन्सचे मेंटॉरपद सोडल्याचे वृत्त आहे. यासंबंधी कोणतीही अधिकृत माहिती समोर आली नसली, तरी ही बातमी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’वर व्हायरल होत आहे.

Rajat Patidar's 4 Consecutive Sixes Video Viral
६,६,६,६…पाटीदारने मयंकच्या षटकात धावांचा पाऊस पाडत रचला इतिहास, आरसीबीसाठी ‘हा’ पराक्रम करणारा ठरला दुसरा खेळाडू
Dinesh Karthik Says I won't be surprised if he crosses the 300 run mark in IPL
IPL 2024 : आयपीएलमध्ये लवकरच ३०० धावांचा टप्पा पार होणार, ‘या’ दिग्गज खेळाडूची मोठी भविष्यवाणी
Glenn Maxwell makes bizarre comment on Virat Kohli
T20 World Cup : ‘मला आशा आहे की विराट कोहलीची निवड होणार नाही’, आरसीबीच्या ‘या’ खेळाडूचे चकित करणारे वक्तव्य
Shubman Gill Angry At Third Umpire's Decision
RR vs GT : तिसऱ्या पंचांच्या ‘त्या’ निर्णयानंतर शुबमन गिल मैदानावरील पंचांवर संतापला, VIDEO होतोय व्हायरल

सर्वकाळातील महान फलंदाजांपैकी एक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सचिनने मुंबई इंडियन्ससाठी ७८ सामन्यांमध्ये २२३४ धावा केल्या, ज्यात एक शतक आणि १३ अर्धशतकांचा समावेश आहे. सचिनने आपल्या नेतृत्वाखाली २०११ मध्ये चॅम्पियन्स लीग टी-२० चे विजेतेपदही मिळवून दिले होते. एक मार्गदर्शक म्हणून, त्याने संघातील इशान किशन, सूर्यकुमार यादव, राहुल चहर आणि जसप्रीत बुमराह यांसारख्या तरुण प्रतिभांना मार्गदर्शन आणि जोपासण्यात महत्त्वाची भूमिका बजावली.

हेही वाचा – IND vs SA 1st ODI : भारताविरुद्धच्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने गुलाबी जर्सी का परिधान केली? जाणून घ्या कारण

रोहित शर्मा, किरॉन पोलार्ड आणि हार्दिक पंड्या यांसारख्या वरिष्ठ खेळाडूंसोबतही त्याने आपला अनुभव आणि ज्ञान शेअर केले. त्याच्या मार्गदर्शनाखाली, मुंबई इंडियन्स हा आयपीएल इतिहासातील सर्वात यशस्वी संघ बनला, ज्याने २०१३, २०१५, २०१७, २०१९ आणि २०२० मध्ये पाच विजेतेपदे जिंकली आहेत.