David Bedingham Handelled The Ball: वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धेतील अंतिम सामना दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया या दोन्ही संघांमध्ये सुरू आहे. या सामन्यातील पहिल्या डावात ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव अवघ्या २१२ धावांवर आटोपला. या धावांचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या दक्षिण आफ्रिकेकडून कर्णधार टेंबा बावुमा आणि बेडिंघम यांनी डाव सांभाळण्याचा पूर्ण प्रयत्न केला. यादरम्यान ऑस्ट्रेलियाचा यष्टिरक्षक ॲलेक्स कॅरीने बेडिंघमला बाद करण्यासाठी डोकं चालवलं, पण बेडिंघमने त्याचा डाव हाणून पाडला. नेमकं काय घडलं? जाणून घ्या.

पहिल्या डावात फलंदाजी करत असताना, दक्षिण आफ्रिकेकडून बेडिंघमने डाव सांभाळण्याचा पूर्ण प्रयत्न केला. तर झाले असे की, बेडिंघम ३१ धावांवर फलंदाजी करत होता. बेडिंघम चांगलाच सेट झाला होता. त्यामुळे ऑस्ट्रेलियाला विकेटची गरज होती. ४९ व्या षटकातील तिसरा चेंडू येऊन बेडिंघमच्या पॅडला लागला. हा चेंडू बेडिंघमच्या पॅडमध्ये जाऊन फसला. यष्टिरक्षक ॲलेक्स कॅरीने या संधीचा फायदा घेण्यासाठी झडप घातली. पण बेडिंघमने त्याआधीच चेंडू हाताने काढून जमिनीवर टाकला. त्यानंतर अंपायरने हा चेंडू डेड बॉल घोषित केला.

बेडिंघमने हा चेंडू हाताने पकडून खाली फेकला. त्यामुळे ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंनी ऑब्स्ट्रक्टींग द फिल्ड नियमानुसार, जोरदार अपील केली. मात्र, अंपायरने ही अपील फेटाळून लावली. अंपायरने दिलेल्या निर्णयानुसार, चेंडू ज्यावेळी पॅडमध्ये जाऊन फसला त्यावेळी तो डेड झाला होता. त्यानंतर ऑस्ट्रेलियन खेळाडूंनाही हसू आवरलं नाही.

काय आहेत नियम?

१. नियम ३७.३.१:

जर चेंडू नो-बॉल नसेल आणि फलंदाजांने मुद्दाम अडथळा आणला तर नियमानुसार फलंदाज बाद ठरू शकतो.

२. नियम २०.१.१
अंपायरकडून हा चेंडू डेड घोषित केला जातो.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

३. नियम २०.१.१.४:
चेंडू खेळलेला असो किंवा नसो, जर तो चेंडू फलंदाजाच्या बॅट आणि शरीरामध्ये अडकतो, किंवा त्याच्या कपड्यांमध्ये किंवा पॅड, हेल्मेटमध्ये अडकला असेल तर तो चेंडू डेड घोषित केला जातो. बेडिंघमच्या बाबतीतही हा नियम लागू करण्यात आला. ऑस्ट्रेलियन खेळाडूंनी जोरदार अपील केली. मात्र, अंपायरने हा चेंडू डेड घोषित केला. त्यामुळे बेडिंघम थोडक्यात बचावला.