३० मे पासून इंग्लंडमध्ये सुरु होणारा विश्वचषक आणि २३ मार्चपासून सुरु होणारं आयपीएल यामुळे भारतीय संघावर, विश्वचषक स्पर्धेआधी मोठा ताण पडणार आहे. २०१८ सालात भारतीय संघावर अतिक्रिकेटमुळे येणारा ताण पाहता बीसीसीआयने विश्वचषकाआधी प्रमुख खेळाडूंना विश्रांती देण्याचा निर्णय घेतला. मध्यंतरी विराट कोहलीनेही बीसीसीआयला, संघातील प्रमुख खेळाडूंना आयपीएलमध्ये ठराविक सामने खेळण्याची परवानी द्यावी अशी मागणी केली होती. मात्र गरज पडल्यास आयपीएलमध्ये विश्रांती घेण्याची तयारी भारतीय संघाचा प्रमुख गोलंदाज भुवनेश्वर कुमारने दर्शवली आहे. आयपीएलमध्ये भुवनेश्वर सनराईजर्स हैदराबाद संघाचं प्रतिनिधीत्व करतो.

“विश्वचषक ही स्पर्धा आम्हा प्रत्येक खेळाडूंसाठी महत्वाची आहे. त्यामुळे आयपीएलच्या दुसऱ्या सत्रात आम्ही फिटनेसकडे अधिक लक्ष देण्याचं ठरवलं आहे. मात्र आयपीएलदरम्यान जर आम्हाला थकवा जाणवला तर आम्ही नक्की विश्रांती घेऊ. यामध्ये संघमालक आणि व्यवस्थापनाचा निर्णयही महत्वाचा असेल.” भुवनेश्वर कुमारने आपली बाजू स्पष्ट केली.

अवश्य वाचा – Video : टीम इंडियात रंगलं सिक्सर चँलेज; पाहा कोणी मारली बाजी

भारतीय संघातील प्रमुख गोलंदाजांवर अतिक्रिकेटचा भार येऊ नये यासाठी बीसीसीआय आणि आयपीएलचे संघमालक चर्चा करणार आहेत. निवड समितीचे प्रमुख एम. एस. के. प्रसाद यांनी याआधी तसे संकेत दिले आहेत. त्यामुळे विश्वचषक स्पर्धा लक्षात घेता प्रत्येक संघव्यवस्थापन सहकार्य करेल असा आत्मविश्वास भुवनेश्वर कुमारने व्यक्त केला.

अवश्य वाचा – भारतीय संघाने घेतला धोनीच्या घरी पाहुणचार, सोशल मीडियावर फोटो व्हायरल