scorecardresearch

Premium

आयपीएल प्रमुखपद पुन्हा स्वीकारणार नाही -शुक्ला

‘स्पॉट-फिक्सिंग’ याचप्रमाणे अन्य वादविवादांमुळे आयपीएल कार्यकारिणी समितीचे अध्यक्ष राजीव शुक्ला चांगलेच निराश झाले आहेत. या प्रकरणांनी त्रस्त झालेल्या शुक्ला यांनी पुन्हा आयपीएलचे प्रमुखपद स्वीकारण्यासाठी आपण इच्छुक नसल्याचे स्पष्ट केले. कार्यकारिणी समितीचे अध्यक्ष म्हणून माझा कार्यकाळ एक वर्षांचा आहे.

आयपीएल प्रमुखपद पुन्हा स्वीकारणार नाही -शुक्ला

‘स्पॉट-फिक्सिंग’ याचप्रमाणे अन्य वादविवादांमुळे आयपीएल कार्यकारिणी समितीचे अध्यक्ष राजीव शुक्ला चांगलेच निराश झाले आहेत. या प्रकरणांनी त्रस्त झालेल्या शुक्ला यांनी पुन्हा आयपीएलचे प्रमुखपद स्वीकारण्यासाठी आपण इच्छुक नसल्याचे स्पष्ट केले. कार्यकारिणी समितीचे अध्यक्ष म्हणून माझा कार्यकाळ एक वर्षांचा आहे. या कार्यकाळाचे नूतनीकरण होऊ शकते. मात्र सलग तिसऱ्या वर्षी हा काटेरी मुकुट स्वीकारण्यासाठी तयार आपण नसल्याचे शुक्ला यांनी सांगितले.
‘‘मी बीसीसीआयमधील कोणत्याही पदासाठी इच्छुक नाही. आयपीएल सामन्यांचे शिस्तबद्ध आयोजन करणे, हे माझे काम होते आणि ते मी केले. वादविवाद होऊनही सर्व सामन्यांना क्रिकेटरसिकांची चांगली गर्दी होती. कार्यकारिणी समितीचे अध्यक्षपद मी एक आव्हान म्हणून स्वीकारले. सर्वोत्तम क्षमता उपयोगात आणत काम करण्याचा प्रयत्न मी केला,’’ असे शुक्ला म्हणाले.

prashant jagtap marathi news, sharad pawar marathi news
“साहेब आपल्या कार्यकर्त्यांच्या जीवाला धोका, तुम्ही वैयक्तिक लक्ष घाला”, शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांचे शरद पवार यांना साकडे
Construction Minister ravindra chavans program boycotted by Guardian Ministers and MP
महायुतीतील घटक पक्षाच्या पदाधिकाऱ्यांच्या घरी गेल्याने बांधकाम मंत्री चव्हाण यांच्या कार्यक्रमावर पालकमंत्री, खासदारांचा बहिष्कार
16th Finance Commission
केंद्र सरकारने १६ व्या वित्त आयोगाच्या चार सदस्यांची केली नियुक्ती
Rahul Narwekar
पक्षांतरबंदी कायदा चिकित्सा समितीच्या अध्यक्षपदी नियुक्ती झाल्यानंतर राहुल नार्वेकरांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व क्रीडा, वर्ल्डकप २०२३ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Will not be ipl chairman again says rajeev shukla

First published on: 30-05-2013 at 02:52 IST

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×