भारतात करोनामुळे निर्माण झालेली परिस्थिती लक्षात घेता यंदाचा आयपीएल हंगाम युएईत आयोजित करण्यात आला आहे. १९ सप्टेंबर ते १० नोव्हेंबर या काळात ही स्पर्धा खेळवली जाईल. एक-एक करुन सर्व संघ युएईत दाखल झाले असून आता परदेशी खेळाडूही हळुहळु आयपीएल खेळण्यासाठी युएईत येत आहेत. सध्या संपूर्ण जग करोना विषाणूच्या प्रादुर्भावाशी लढतं आहे. अशा परिस्थितीत आयपीएलसाठीही बीसीसीआय आणि सर्व संघमालकांनी खास उपाययोजना आखल्या आहेत. युएईमधील ३ मैदानांवर हे सामने खेळवले जातील. यंदाची स्पर्धा भारतात होणार नसल्यामुळे युएईमधील खेळपट्ट्यांशी जुळवून घेताना सर्व खेळाडूंचा विशेष कस लागणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: With few days to go for ipl 2020 here is all you need to know about venues in uae psd
First published on: 26-08-2020 at 19:24 IST