महिलांच्या आयसीसी विश्वचषक क्रिकेट स्पर्धेतील काही सामने कटक येथे होतील, मात्र अंतिम सामना मुंबईतच होणार आहे, अशी माहिती आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डेव्ह रिचर्डसन यांनी दिली.
पाकिस्तानने सीमारेषेवर भारताच्या दोन जवानांचा शिरच्छेद केल्यानंतर पाकिस्तानी खेळाडूंचा सहभाग असलेले सामने महाराष्ट्रात आयोजित करण्याबाबत काही राजकीय पक्षांनी विरोध दर्शविला होता. त्यामुळे हे साखळी सामने महाराष्ट्राबाहेर घेण्याचा निर्णय आयसीसीच्या संयोजन समितीने घेतला आहे. साखळी गटातील काही सामने तसेच ‘सुपर सिक्स’ विभागातील काही सामने कटक मधील बाराबती स्टेडियमवर होतील. अंतिम सामना १७ फेब्रुवारीला ब्रेबॉर्न स्टेडियमवर होईल.
संग्रहित लेख, दिनांक 26th Jan 2013 रोजी प्रकाशित
महिला विश्वचषकाचे सामने कटकमध्येही होणार
महिलांच्या आयसीसी विश्वचषक क्रिकेट स्पर्धेतील काही सामने कटक येथे होतील, मात्र अंतिम सामना मुंबईतच होणार आहे, अशी माहिती आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डेव्ह रिचर्डसन यांनी दिली.
First published on: 26-01-2013 at 03:39 IST
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Women world cup matches at cuttack